"मधुकर विश्वनाथ लिमये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छोNo edit summary
ओळ ९:
हे पुस्तक म्हणजे हा आसामच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघकार्याचा इतिहास नसून विसाव्या शतकाच्या मध्यात आसामात आलेल्या एका कार्यकर्त्याच्या अनुभवांचे हे चित्रण आहे. पुस्तक वाचून आसामच्या संघकार्यात सुरुवातीला आलेल्या अडचणी, तसेच मिळालेला पाठिंबा ह्या दोन्हींची जाणीव वाचकाला होऊ शकेल. संघकार्याच्या कालखंडाचा प्रत्यक्षदर्शी अशी लेखकाची भूमिका आहे. पुस्तक वाचून आसामात कार्य करायला येणार्‍या नवीन कार्यकर्त्यांना एखादा संदेश मिळावा अशी लेखकाची अपेक्षा आहे. आपल्या सर्व अनुभवांना अभिव्यक्त करणे लेखकाला शक्य नसल्याने त्याने काही निवडक घटनांचा समावेश केला आहे. यात तत्कालीन परिस्थिती, संकटे, आव्हाने याचे वर्णन आहे. कार्यकर्ता म्हणून लेखकाचा कस कसाकसा लागत गेला, याचे हे प्रांजल कथन आहे.
 
१९४८च्या संघबंदीनंतर पंजाबहून रामसिंह ठाकूर यांची आसाम प्रांत प्रचारक म्हणून नियुक्ती झाली. त्या मागोमाग मधुकरराव लिमयांसह अन्य काही प्रचारक येथे आले. १९५०मध्ये झालेल्या भयावह भूकंपामुळे तेथील जनजीवन अस्तव्यस्तअस्ताव्यस्त झाले होते. पूर्व पाकिस्तानातून हजारो हिंदू शरणार्थी आसाममध्ये आश्रयास आले होते. त्यामुळे येथे पूर्वापार चालत असलेले भाषिक वैमनस्य तीव्र होऊ लागले. घुसखोर बांगला भाषिक मुसलमान या आगीत तेल ओतण्याचा प्रयत्‍न करीत होते. ह्या परिस्थितीचे संक्षिप्त वर्णन प्रस्तुत पुस्तकात आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी अज्ञान व अपप्रचाराला देखील संघाला तोंड द्यावे लागले. मधुकररावांच्या मागे बंदूक घेऊन जाण्याचे अथवा खोटे आरोप लावून त्यांना कोर्टात खेचण्याचे प्रयत्‍न झाले. या परिस्थितीतून मार्ग काढून विरोधकांना संघानुकूलच नव्हे तर कार्यकर्ते कसे बनवले याचा उल्लेख पुस्तकात आहे. तळागाळातील तरूणांना हाताशी धरून संघसंस्कारातून कार्यकर्ता कसा घडू शकतो, याचे वर्णन या पुस्तकात आहे. कार्यकर्त्यांच्या कमतरतेमुळे निराश, होणार्‍या प्रचारकांना ‘निर्वाहः प्रतिपन्न व्यक्तिषु’ म्हणून मधुकरराव धीर देत असत.