"उत्तङ्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन लेख
(काही फरक नाही)

०१:३१, २५ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

उत्तङ्क हा महाभारत कथेच्या सुरूवातीस उल्लेखलेला एक ब्राम्हण होय. उत्तङ्क राजा जनमेजयाचा गुरूबंधू होता. ज्या सर्पसत्रात वैशंपायनाने जनमेजयाला महाभारत कथा सांगितली, ते सर्पसत्र करण्यास जनमेजयाला उत्तङ्काने उद्युक्त केले म्हणून उत्तङ्काचे महत्त्व आहे.

उत्तङ्काच्या विद्यार्थीदशेतली एक कथा महाभारताच्या आदिपर्वात आहे. या कथेत असे सांगितले आहे की त्याच्या शिक्षणाच्या शेवटी उत्तङ्कास त्याच्या गुरूपत्नीने राजा पौष्याच्या राणीच्या कानातला दागिना गुरूदक्षिणा म्हणून मागितला. हा दागिना आणायला पौष्याकडे जात असताना उत्तङ्काला हत्तीवर बसलेला एक पुरूष, एक चरखा चालविणारी सहा मुले, आणि त्या चरख्यावर काळ्या व पांढऱ्या धाग्यांने कापड विणणाऱ्या दोन स्त्रिया असे एक रहस्यमय दृष्य दिसते. हे दृष्य जीवनाचे रूपक मानले जाते. पुढे पौष्याकडून दागिना घेऊन गुरूगृही परतताना उत्तङ्काला तक्षक नाग सतावतो. त्यामुळेच उत्तङ्काचे सर्पाविरूद्ध शत्रुत्व उद्भवते.