"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३१३:
गणेश ढवळीकर यांनी १९५५च्या सुमारास अनुवादित केलेल्या शेक्सपिअरच्या नाटकांच्या कथा अनेक वर्षे बासनात राहिल्या होत्या. पुढे या कथा भारद्वाज प्रकाशनने 'शेक्सपिअरच्या नाट्यकथा' या पुस्तकाद्वारे २०१५ साली प्रकाशित केल्या. वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये ढवळीकर इंग्रजीचे अध्यापन करायचे. त्यांनी शेक्सपिअरची नाटके कथारूपात आणतानाच स्वतःचेही वेगळे लेखन केले होते. १९६५मध्ये त्यांचे निधन झाले. ते हयात असताना त्यांचे साहित्य पुस्तकरूपाने प्रकाशित होऊ शकले नाही. पुढे ते काळाच्या ओघात नष्ट झाले. शेक्सपिअरच्या नाटकांच्या या अनुवादित कथा त्यांची नात मीरा आपटे ढवळीकर यांच्याकडे होत्या. भारद्वाज प्रकाशनचे ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम रानडे यांनी जीर्ण झालेल्या कागदांवर लिहिलेल्या त्या कथा नव्या स्वरूपात प्रकाशित केल्या आहेत.
 
'शेक्सपिअरच्या नाट्यकथा' या पुस्तकात मर्चंट ऑफ व्हेनिस, सिंबेलाइन ऑगस्टस सीझर, मॅकबेथ, तुफान, हॅम्लेट, लिअर राजा, रोमिओ आणि ज्युलिएट या कथारूप नाट्यकृती, ढवळीकर यांचाच स्वप्नातील जग हा लेख, [[वि.वा. शिरवाडकर]], प्रा. [[ग .प्र. प्रधान]] अशा मराठीतील श्रेष्ठ लेखकांचे शेक्सपिअरविषयीचे लेखही या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत.
 
जयको पब्लिशिंग हाऊसने ’शेक्सपीअरच्या कथा’ नावाचे एक ३०० पानी पुस्तक २०१८साली प्रकाशित केले आहे.
 
==शेक्सपिअरसंबंधी मराठीतली अन्य पुस्तके/साहित्य==