"पर्यटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०:
 
==[[इतिहास]]==
 
अतिप्राचीन काळापासून प्रवास ही मनुष्यप्राण्याची सहज प्रवृत्ती आहे. प्राचीन काळातील प्रवासाच्या पद्धती व संकल्पना या आजच्या काळातील प्रवास पद्धती व संकल्पना यापेक्षा वेगळया आहेत. प्राचीन काळी प्रवासाचा उद्देश नवीन प्रदेशचा शोध घेणे, व्यापार करणे व धार्मिक स्थळांना भेट देणे हा होता. हे प्रवासी व व्यापारी विविध भूप्रदेश, देश व राज्यातून प्रवास करत असत. त्यामुळे विविध राज्यांच्या राजधान्या, शहरे, बंदरे, बाजारपेठांची केंद्रे, व्यापारी मार्ग यांचा त्यांच्याषी संबंध येत असे. हा प्रवास व व्यापार यांतून विविध मानवी समूह, संस्कृती यांची परस्पर ओळख झाली. अनेक गोष्टीची देवाण घेवाण झाली. एकमेकांच्या समाजजीवनाचे आकलन झाले. प्रवास व पर्यटनाच्या वाढीसाठी या बाबी अनुकूल ठरल्या. मध्ययुगात व्यापाÚयांच्या प्रवासाच्या पद्धतीत बदल झाले.
आनंद मिळविण्यासाठी, मनोरंजनासाठी प्रवास ही संकल्पना प्रथम युरोपातील रोमन लोकांनी रूजवली. रोमन साम्राज्याच्या काळात तेथील लोक इजिप्तमधील पिरॅमिड्स, ग्रीसमधील अथेन्स व स्मार्टा या नगरांची भव्य नगररचना, तेथील देव देवतांची मंदिरे, मूर्ती, तेथील क्रीडांगणे पाहण्यासाठी जात. पुढे युरोपमधील पुनरूज्जीवनामुळे जगभरातील वसाहतींचा व साम्राज्याचा विस्तार, औद्योगिक क्रांती व यातून युरोपमध्ये सुरू झालेला संपत्तीचा ओघ यांमुळे तेथे पर्यटनही श्रीमंतांची मक्तेदारी न राहता मध्यम वर्गसुद्धा पर्यटनात सहभागी झाला. त्यात धर्मप्रसारक, विद्वान, लेखक, कवी व व्यापारी यांचा समावेश होता. युरोपियन पर्यटकांनी आधुनिक पर्यटनाचा पाया घातला.
 
===महापर्यटन (Grand Tour)===
===फुरसतीच्या पर्यटनाचा उदय===
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्यटन" पासून हुडकले