"मेथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर घातली.
ओळ १:
[[चित्र :Illustration Trigonella foenum-graecum0 clean.jpg|right|thumb|मेथी]]
'''मेथी'''(शास्त्रीय नाव: ''Trigonella foenum-graecum'', ''ट्रिगोनेला फीनम-ग्रासम'') ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. ही पाने व बिया (मेथीदाणे) या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीची पाने व मोड आलेले मेथीदाणे हे भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात.मेथीला कडवट चव असते.
==उत्पादन==
[[नेपाळ]], [[भारत]], [[पाकिस्तान]], [[बांगलादेश]], [[आर्जेन्टिना]], [[इजिप्त]], [[फ्रान्स]], [[स्पेन]], [[तुर्कस्तान]], [[मोरोक्को]] आणि [[चीन]] या देशांत मेथीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. भारतात [[राजस्थान]] राज्यात मेथीचे सर्वांत जास्त उत्पादन होते. तसेच हिवाळया मध्ये मेथी चे उत्पादनाचे प्रमाण जास्त असते.
 
==वापर==
[[लोणचे|लोणची]], रसभाज्यांसाठी वापरण्यात येणारे मसाले तसेच वाटणे यांमध्ये मुख्यतः मेथीदाण्याचा वापर केला जातो. मेथी ही एरिट्रीअन तसेच इथिओपियन जेवणातही वापरली जाते. [[इथियोपिया|इथिओपियामध्ये]] मेथीदाणे हे [[मधुमेह|मधुमेहावरचे]] औषध म्हणून वापरले जातात. काही [[यहुदी]] लोक प्रथा म्हणून [[रोश हाशना|रोश हाशनाच्या]] (यहुदी नववर्ष) पहिल्या आणि दुसऱ्या रात्रीच्या जेवणात मेथीचा समावेश करतात.मेथीच्या पानांची भाजी केली जाते. अंगावर पाजणाऱ्या आयांना दूध यावे म्हणून मेथीदाण्यांचा, मेथीच्या भाजीचा वापर त्यांच्या जेवणात केला जातो. मेथीच्या पानांपासून भजी केली जातात. मेथीच्या पानांचे मुटके केले जातात. मेथीची भाजी उंधियो या गुजराथी पदार्थात वापरली जातात. मेथीची पाने कणकेत मिसळून पराठे, ठेपले असे पदार्थ केले जातात.
मेथीची भाजी आणि भाकरी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांचा आवडता आहार आहे.
 
==चित्रावली==
Line १७ ⟶ १८:
[[वर्ग:पालेभाज्या]]
[[वर्ग:वनस्पती]]
मेथी हा भाजीपाला म्हणुन ओळखला जातो . मेथी खाल्याने अनेक फायदे शरिरावर होतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/मेथी" पासून हुडकले