"ओंकारेश्वर (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:पुण्यातील देवळे; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
शुद्धलेखन
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ १:
नक्षीकामाचे नऊ कळस, [[महर्षी व्यास|महर्षी व्यासांचे]] शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरूंचे शिल्प, अंतर्गत प्रदक्षिणामार्ग अशी आगळी वेगळी वैशिष्ट्ये असलेले [[पेशवे]]कालीन ओेंकारेश्वर मंदिर सोमवारी २ जुलै २०१२ रोजी आपल्या स्थापनेची २७४ वर्षे पूर्ण करीत आहे. [[नर्मदा नदी|नर्मदेवरून]] आणलेल्या बाणाची शिवलिगाचीशिवलिंगाच्या तांबड्या पाषाणाच्या साळुंखेमध्ये प्रतिष्ठापना झाली तो [[आषाढ]] शुद्ध त्रयोदशीचा दिवस होता. हा योग साधून हे पेशवेकालीन मंदिर २७५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे.
 
पेशव्यांनी ऑक्टोबर १७३६ मध्ये या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला आणि पुढील वर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवलिगाची स्थापना करण्यात आली. ‘गाय उतारी शिवालया करविले' असा त्याचा पेशवे दप्तरा मध्ये उल्लेख आहे. अवघा खर्च पेशव्यांनी केला. कामकाजाचे पौरोहित्य चित्रावशास्त्री यांनी केले, असेही पेशवे दप्तरामध्ये नमूद केले आहे. पेशव्यांतर्फे ओंकारेश्वराला दरवर्षी १३५०रुपये अधिक साडेसात रुपये इतके अनुदान दिले जात होते. याखेरीज [[महाशिवरात्र|महाशिवरात्रीला]] एक हजार रुपये स्वतंत्र दिले जात असत. त्याकाळी सोने १५ रुपये तोळा होते. यावरून या अनुदानाची रक्कम किती असावी याचा अंदाज येतो.