"रत्‍नागिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६५:
[[रत्नागिरी विमानतळ]] तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. २०१८ मध्ये येथून मुंबई साठी विमानसेवा सुरू होणे अपेक्षित आहे.
 
==रत्‍नागिरीतील पर्यटनस्थळे==
टिळक स्मारक, पतित पावन मंदिर, थिबा पॅलेस, [[रत्‍नागिरी किल्ला]], दीपस्तंभ, [[भगवती बंदर]], भाट्ये चौपाटी, काळा समुद्र.
===रत्नागिरी किल्ला===
हा रत्नदुर्ग किल्ला किंवा भगवती किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. हा किल्ला शिलाहार राजा भोज याने बांधला होता. त्यानंतर हा किल्ला आदिलशाही राजवटीत समाविष्ट झाला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. आज या किल्ल्यावर असलेले भगवती देवीचे मंदिर रत्नागिरी शहराचे श्रद्धास्थान आहे. पर्यटन स्थळ म्हणूनही या किल्ल्याची ओळख आहे. या किल्ल्यावर एक भुयारी मार्गही आहे. हा मार्ग समुद्रात तीन वेगवेगळ्या दिशांना उघडतो. डिसेंबर २०१७ मध्ये जिद्दी माउन्टेनिअर्स या रत्नागिरीतील साहसी खेळांच्या / गिर्यारोहकांच्या संघटनेने या किल्ल्याच्या तळाशी असलेल्या गुहेचा शोध लावला आहे. याची दखल एबीपी माझा या वृत्तवाहिनीने घेतली होती. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेने येथे हौशी पर्यटक आणि साहसी शहरवासियांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या किल्ल्यावर नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दिवाळीच्या पहिल्या दिवशीही रत्नागिरीकर देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.
 
==चित्रदालन==
<gallery>