"सामाजिक बांधिलकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
 
बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्यप्राण्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी करणे अपेक्षित आहे. नाहीतर इतर प्राणिमात्र आणि मनुष्य यांच्यात फरकच उरणार नाही. यातून मनुष्य जर सत्प्रवृत्त असेल, निदान त्याच्यातील कृतज्ञतेची भावना मारली गेली नसेल, तर इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना वाढीस लागते. हीच सामाजिक बांधिलकी होय!
या संपूर्ण विश्वात आपल्या जीवनाइतके दुसरे महत्त्वाचे काहीही नाही. हे मानवी जीवन त्रिमित आहे. जीवनाला लांबी (वय), रुंदी (प्रकृती) आणि खोली (इतरांसाठी तुम्ही काय केले) आहे. माणसाचे खरे मोठेपण या तिसऱ्या मितीवर ठरते.' प्रख्यात धन्वंतरी डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे हे विचार निश्चितच चिंतनीय, मननीय आहेत. अशा 'त्रिमित जीवनांची' आपल्या देशाला मोठीच परंपरा लाभली आहे. सामान्य माणसाला त्या थोर व्यक्तिमत्त्वांइतकं आदर्श होता येणार नाही कदाचित; पण त्यांच्या मार्गावरील गवताचं एखादं पातं व्हावं असं अनेकांना वाटतं. त्या अनेकांमधील मी एक असावं असाही विचार प्रत्येकानं करावा. कधीतरी मीही या गवताच्या मोहात पडलो. होतो.