"भारूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
लोकशिक्षणासाठी संतांनी भारुडांची रचना केली. भारूड हे नुसते गायनाने दाखवायचे नसते तर त्याचे संपादन ही करावे लागते. भारुडांत ब्रह्म ज्ञानाला गोष्टीचे रूप देऊन मनोरंजन करावे लागते. तसेच भारूड म्हणणारी व्यक्ती ही अध्यायाबरोबरच [[नाट्यकर्मी]] ही असावी लागते. या दोन्ही गोष्टींची सांगड घातली गेल्यामुळेच जन मनोरंजनाची साधने म्हणून शतकानुशतके लोक शिक्षणाचे व स्वधर्म जागृतीचे कार्य भारुडांनी केले आहे. हीच भारुडे लळितात अभिनय करून संभाषणे टाकून म्हटली जातात आणि म्हणूनच लळिताचे बीज भारुडात आहे असे म्हटले जाते. [[मराठी]] संतांनी प्रौढ, सुशिक्षित जनांसाठी [[भागवत]], [[ज्ञानेश्वरी]], गाथा, [[अमृतानुभव]] अशा प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती केली. तसेच इतर सर्वजनांनाही परमार्थाचा आनंद घेता यावा व अध्यात्म सुलभ व्हावा म्हणून भारुडांची व्यवस्था केली. हा एक वारकरी कला आविष्कार आहे.
===स्त्री भारूड सादरकर्त्या===
पूर्वी भारूड फक्त पुरुष सादर करीत असत. परंतु ही परिस्थिती आता बदलली आहे. संत साहित्याच्या अभ्यासक गंगूबाई जाधव, लक्ष्मीबाई गिराम आणि चंदाबाई तिवाडी या स्त्री-भारुडकर्त्या भारूडे सादर करीत असतात. चंदाबाई तिवाडी यांना तर संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळालेला आहे. आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर कार्यक्रम करण्यास त्यांना आमंत्रित केले जाते. महाराष्ट्रात निरंजन भाकरे, चंदाबाई तिवाडी आणि मीराबाई उमप या भारूड सादरर्कते आहेत.स्वातंंत्र्यपूर्व काळात जुन्नर तालुक्यातील राधाबाई आरोटे व सीताबाई आरोटे,डुंंबरवाडी यांंनी महाराष्ट्रभर वारकरी भारुडे सादर केली.पुरुषवेष धारण करुन या दोघी बहिणींंनी मुंंबईसह महाराष्ट्र गाजविला.मुंबई मध्ये त्यांच्या भारुडासाठी अलोट गर्दी व्हायची.
 
==भारूड महोत्सव ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भारूड" पासून हुडकले