"विज्ञानकथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
व्याकरण सुधरविले
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
ओळ १३:
जयंत नारळीकर यांच्या कृष्णविवर या कथेपासून विज्ञानकथेकडे गंभीरपणे पाहिलं जायला लागलं. अर्थात,  जयंत नारळीकर यांच्याआधीही  निरंजन घाटे विज्ञान कथा लेखन करत होतेच.  निरंजन घाटे १९७१ पासून विज्ञान कथास्पर्धेत बक्षीस मिळवणारे विज्ञान साहित्य लेखक आहेत. १९७५ च्या साहित्य संमेलनात दुर्गाबाई भागवत यांनी जयंत नारळीकर यांच्या विज्ञानकथांची आणि ते करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेतली आणि त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तेव्हापासून विज्ञानकथा या प्रकाराला समीक्षकांनी गंभीरपणे घेतलं. आणि मग तिची दिवसेंदिवस प्रगती होतच राहिली. त्याच काळात ललित कथांशी जवळीक साधून ललित कथांच्या निकषाला अनुसरून विज्ञान कथा  लिहायला सुरुवात केली ती विज्ञान कथा लेखक  बाळ फोंडके यांनी.  विज्ञानकथा लेखन या प्रकारात बाळ फोंडके यांचं योगदान फार महत्वपूर्ण आहे.विज्ञानातल्या नव्या शोधांमुळे मानवी नातेसंबंधांचा जो विचित्र गुंता होतो याचं चित्रण त्यांच्या विज्ञानकथांमधून दिसून येतं. लक्ष्मण लोंढे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय  विज्ञान कथाकारांची यादी अपूर्णच राहील.त्यानंतर विज्ञानकथा लेखकात श्री. सुबोध जावडेकर यांनी लिहिलेल्या विज्ञानकथांची शैली विशेष उल्लेखनीय अशी आहे.  त्यांच्या कथेतील काल्पनिकता श्वास रोखून ठेवणारी आणि कथाही उल्लेखनीय अशा आहेत. 
 
याव्यतिरिक्त अरुण साधू ,  अरुण हेबळेकर अरुण मांडे, संजय ढोले , शुभदा गोगटे यांच्या विज्ञानकथातून त्यांनी माणसांचा वेध घेतला गेलेला आहे. प्रा. माधुरी शानबाग यांच्या विज्ञानकथा लेखनात तंत्रज्ञानाच्या झपाट्यात माणूसपणाच्या खुणा शोधण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. तर अरुण मांडे यांच्या विज्ञानकथेत विशेष शैली दिसून येते. 
 
इतर साहित्याच्या तुलनेत विज्ञान साहित्याकडे जास्त मूलभूत पातळीवर जीवनदर्शन घडवण्याची क्षमता असते. मराठी विज्ञानकथेने गेल्या पन्नास साठ वर्षात गाठलेला पल्ला प्रशंसनीय आहे. आणि आता पुढे तशीच वाटचाल कायम चालू राहील असं आशादायी लिखाण होत आहे.