"कुंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
या पानावरील सगळा मजकूर काढला
खूणपताका: मिवि.-कोरे करणे
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Kunti Gandhari Dhrtarashtra.jpg|thumb|right|250px|'''{{लेखनाव}}''' वानप्रस्थासाठी जात असताना; मागे [[धृतराष्ट्र]] व [[गांधारी]] (काल्पनिक चित्र; इ.स. १५९८)]]
'''कुंती'' ही [[महाभारत|महाभारतातील]] [[हस्तिनापुर|हस्तिनापुराच्या]] [[पंडू|पंडू राजाची]] पत्नी व [[पांडव|पांडवांमधील]] थोरल्या तिघांची आई होती. [[यादव|यादव कुळातील]] [[शूरसेन|शूरसेनाची]] कन्या असलेल्या कुंतीचे बालपणीचे नाव ''पृथा'' असे होते. नि:संतान असलेल्या [[कुंतिभोज]] राजाला दत्तक गेल्यावर तिचे नाव ''कुंती'' असे ठेवण्यात आले.
 
कुंतीच्या सेवेवर प्रसन्न होऊन [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषींनी]] तिला एका मंत्राचे वरदान दिले. त्या मंत्राचा वापर करताच ज्या दैवताचे स्मरण ती करेल, त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होणार होती. कुमारी असलेल्या कुंतीने [[सूर्य|सूर्याचे]] स्मरण करून मंत्रोच्चार केला आणि मंत्राच्या प्रभावाने पुत्रप्राप्ती झाली. ह्या सूर्यपुत्राला जन्मतः अंगावर अभेद्य [[कवच]] आणि कानात [[कुंडले]] होती. या पुत्राचे नाव कुंतीने [[कर्ण_(महाभारत)|कर्ण]] असे ठेवले. परंतु अविवाहित असताना या पुत्राला जवळ ठेवणे तिला शक्य नव्हते, म्हणून कुंतीने एका पेटीत विपुल धन ठेवून त्यामधे या पुत्राला ठेवले व ती पेटी नदीत सोडून दिली. ही पेटी अधिरथ नावाच्या कौरवांच्या [[सारथी|सूताला]] सापडली. त्याने या मुलाला आपल्याच पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले.
 
पुढे कुंतीचा विवाह [[हस्तिनापुर|हस्तिनापूरचा]] राजा [[पंडू|पंडूशी]] झाला. तिला [[माद्री|माद्री]] नावाची सवत देखील होती. एकदा पंडू्ने शिकार करताना चुकून [[किंदम_ऋषी|किंदम ऋषी]] पति-पत्नीस हरणांची जोडी समजून बाण मारला. मरण्यापूर्वी किंदम ऋषींनी पंडूला शाप दिला की जेव्हा तो एखाद्या स्त्रीजवळ शरीरसुखाच्या अपेक्षेने जाईल, तेव्हा त्याला तात्काळ मृत्यू येईल. यानंतर विफल होऊन, राज्यत्याग करून पंडू आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासात राहू लागला. पुत्रप्राप्तीचा मार्ग खुंटल्याने पंडूने कुंतीला व माद्रीला [[नियोग|नियोग]] पद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेण्यास सांगितले. तेव्हा कुंतीने तिच्याकडे असलेल्या मंत्राच्या सामर्थ्याबद्दल पंडूला माहिती दिली.. पंडूने त्या मंत्राद्वारे पुत्रप्राप्ती करून घेण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर कुंतीने [[यमधर्म|यमापासून]] [[युधिष्ठिर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम|भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन|अर्जुन]] असे तीन पुत्र प्राप्त करून घेतले. आपली सवत माद्री हिलादेखील माता होण्याचा अधिकार मिळावा म्हणून कुंतीने तिला आपला मंत्र दिला. नंतर माद्रीनेही त्या मंत्रसामर्थ्याने [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल|नकुल]] आणि [[सहदेव|सहदेव]] हे जुळे पुत्र प्राप्त करून घेतले. पंडू राजाच्या या पाच पुत्रांनाच [[पांडव|पांडव]] असे म्हणतात. कुंती ही माद्रीच्या मुलांनाही आपल्या पोटच्या मुलांप्रमाणेच वागणूक देत असे.
 
पुढे शापाचा विसर पडून पंडू व माद्रीसोबत प्रणय करू पहात असताना, त्याचा किंदम ऋषींच्या शापाच्या प्रभावाने मृत्यू झाला व त्याचे प्रायश्चित म्हणून माद्री त्याच्याबरोबर सती गेली. यानंतर कुंती पाचही पुत्रांना घेऊन हस्तिनापुरास परतली. या घटनेमुळेच [[दुर्योधन|दुर्योधनाच्या]] मनात असंतोष जागा झाला.
 
[[कौरव|कौरव]] व [[पांडव|पांडव]] कुमारवयीन असताना हस्तिनापुरात युद्धकला स्पर्धेचे आयोजन केलेले असताना तेथे कर्णास पाहिल्यावर कुंती त्याला आपला पहिला पुत्र म्हणून ओळखते, मात्र ती याची वाच्यता कुठेही करत नाही. महाभारत युद्धापूर्वी श्रीकृष्ण जोपर्यंत कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगत नाही तोपर्यंत कुंती ही आपली माता आहे, हे कर्णालादेखील ठाऊक नसते.
 
[[द्रौपदी|द्रौपदीचा]] पाच पांडवांशी विवाह होण्यास कुंतीच्या तोंडून अनावधानाने बाहेर पडलेले शब्द कारणीभूत होतात.
 
पुढे [[महाभारत|महाभारत]] युद्धप्रसंगी एके दिवशी कुंती आपला पहिला पुत्र कर्ण यास भेटावयास गेली व त्याचा जीव वाचवण्यासाठी, तिने त्याला पांडवांना सामील होण्याविषयी सुचवले, मात्र कर्णाने या गोष्टीस नकार दिला. शेवटी महाभारतीय युद्धामध्ये कर्ण अर्जुनाकरवी मारला गेल्यावर कुंतीने कर्णाच्या जन्माचे रहस्य पांडवांना सांगितले व त्याचा अंत्यविधी योग्य प्रकारे व्हावा असे तिने आवाहन केले.
 
महाभारत युद्धसमाप्तीनंतर कुंती राजसुखाची अपेक्षा न करता [[धृतराष्ट्र|धृतराष्ट्र]] व [[गांधारी|गांधारी]] यांच्यासोबत [[वानप्रस्थाश्रम|वानप्रस्थाश्रमास]] निघून गेली.
 
==कुंती्वरील पुस्तके==
कुंतीच्या जीवनावर या विषय
 
{{महाभारत}}
[[वर्ग:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कुंती" पासून हुडकले