"हादगा वृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४५२ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
{{गल्लत|हादगा}}
'''हादगा''' (सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा) हा एक वृक्ष आहे. याला अगस्ती किंवा अगस्ता या नावानेही ओळखले जाते. या वृक्षाची वाढ झटपट होते. याचे आयुर्मान तीन ते साडेतीन वर्ष इतके असते व उंची जवळपास १५ ते ३० फुटांपर्यंत असते. ही झाडे देवळांजवळ लावली जातात. तसेच शेताच्या बांधावर यांची लागवड केली जाते. या झाडाला पांढरी, पिवळट-पांढरी किंवा लालसर रंगाची फुले येतात. ही फुले देवाला वाहतात. फुलांची भाजी करतात. या झाडाच्या फुलांचा, पानांचा व सालीचा औषधी उपयोग केला जातो. झाडाच्या पानांचा जनावरांना चारा म्हणून, तर झाडाचे लाकूड शेतीची अवजारे तयार करण्यासाठी उपयोगास येते.. आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठीही यांचा उपयोग होतो.[१] हादग्याच्या पानाची व फुलाची भाजी करतात. हादग्याचीफुले पांढऱ्या रंगाची असतात. हि वनस्पती प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये विपुल प्रमाणात आढळून येते. हे झाड मध्यम उंचीचे असते.
 
==भारतीयaramतीय जीवनपद्धतीत==
झाडांची पूजा करण्याची प्रथा प्राचीन कालापासून भारतात आहे.हादगा हे झाड कोकणात फार उपयोगी मानले जाते.पाउस काळात त्याला बहर येतो.या फुलांची भाजी व पिठात फुले घालून भाकरीही करतात.कोवळ्या शेंगांची भाजीही करतात.