"झोप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ५:
झोपेत असताना आपण झोपेच्या पाच अवस्थेमधून जातो. अवस्था १, २, ३, ४ आणि रेम झोप . रेम झोप म्हणजे रॅपिड आय मूव्ह्मेंट. झोपताना आपण बहुघा झोपेच्या एक पासून पाचव्या स्थितीपर्यंत जातो. त्यानंतर झोपेचे दुसरे चक्र पहिल्यापासून चालू होते. दुसऱ्या झोपेची अवस्था पन्नास टक्के एवढा वेळ असते. वीस टक्के रेम झोपेमध्ये आणि तीस टक्के इतर स्थितीमध्ये. तुलनेने नुकतीच जन्मलेल्या बालकामधील पन्नास टक्के वेळ रेम झोपेमध्ये जातो.
 
झोपेच्या पहिल्या स्थितीमधून आपल्याला सहज बाहेर येता येते. ही अवस्था पेंगुळलेली असते. [[डोळे]] जड झालेले असतात. [[स्नायू]] शिथिल झालेले असतात. झोपेच्या पहिल्या अवस्थेतून जागे झालेल्या व्यक्तीना झोपेपूर्वीची काहीं प्रसंग विस्कळित असे आठवतात. पहिल्या अवस्थेमधील झोपेमध्ये आपण दचकून पडल्याची भावना ब-याच जणाना होते. पहिल्या अवस्थेमधून झोपेच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर डोळ्यांची हालचाल थांबते. मेंदूचा [[आलेख]] स्थिर असतो. झोपेच्यातिस-या अवस्थेमध्ये मेंदू आलेखामध्ये डेल्टा लहरी दिसू लागतात. चवथ्या अवस्थेमध्ये सतत डेल्टा लहरी दिसतात. झोपेच्या चवथ्या अवस्थेमधून व्यक्ती लवकर जागे होत नाही. या अवस्थेमध्ये लहान मुलामध्ये अंथरूण ओले करणे, झोपेमध्ये चालणे, घाबरून उठणे असे प्रकार घडतात.झोप ही आपल्या शरीरासाठी खुप महत्वाची आहे. झोप ही ७ तास घ्यावी.
झोप लागल्यानंतर सत्तर ते नव्वद मिनिटानी रेम झोप चालू होते. या झोपेमध्ये श्वास जलद, अनियमित आणि अपूर्ण असतो.डोळे सर्व दिशेला भराभरा फिरतात. अवयवांचे स्नायू शिथिल झालेले असतात. [[हृदयाची गति]] आणि [[रक्तदाब]] वाढतो. पुरुषामध्ये [[लिंग]] ताठ होते. रेम झोपेमधून जागे केले असता ब-याच व्यक्ती असंबद्ध बोलतात. या झोपेच्या अवस्थेमध्ये [[स्वप्ने]] पडतात. झोपेचे पूर्ण चक्र सरासरी 90-110 मिनिटांचे असते. झोप चक्राच्या शेवटी रेम झोप आणि परत झोपेचे पुढील चक्र चालू होते. पहाटे लागणारी झोप 1-2 आणि रेम झोपेची असते.
 
==परिणाम==
"https://mr.wikipedia.org/wiki/झोप" पासून हुडकले