"शेती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
No edit summary
ओळ २६:
दुर्जल शेती : वार्षिक ५० सेंमी. किंवा त्यापेक्षा कमी अशा निश्चित पर्जन्यमानाच्या प्रदेशात दुर्जल शेती करतात. ओल टिकविणे आणि भूसंरक्षण अशा प्रकारच्या शेतीतील महत्त्वाच्या समस्या होत. काही थोड्या पावसाळी महिन्यांत व त्यांच्या थोड्या मागील-पुढील काळात होणारी ही हंगामी शेती असते. पिकांची निवड मर्यादित असते. भूसंरक्षण करण्यासाठी आणि ओलावा टिकविण्यासाठी शेतीच्या मशागतीच्या काही खास शिफारस केलेल्या पद्घती वापरुन ही पिके काढली जातात. उदा., समपातळीत बांध घालून त्यांना समांतर पिकांची पेरणी करणे, कमी बी पेरणे, रोपांची संख्या मर्यादित करणे, पट्टापेर पद्घतीने पीक पेरणे, आच्छादनाचा वापर करणे, खतांचा माफक वापर करणे इत्यादी.
जिराईत शेती : या शेती प्रकारात ५० ते १०० सेंमी.च्या आसपास असणार्‍या, अधिक निश्चित असलेल्या पर्जन्यमानावर पिके काढली जातात. भारतातील काही भागांत खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामांत पिके काढणे शक्य असते. या प्रकारच्या शेतीत खताचा मुबलक वापर करता येतो. आच्छादनाचा वापर करुन जिराईत शेती जास्त फायदेशीर करता येते. भारतात अनेक राज्यांत अशा प्रकारची शेती करतात.
बागायती शेती : वास्तविक हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्घत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईत पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठ्यामुळे सबंध वर्षभर पिके घेतली जातात. साधनसामगीचा वापरसुद्घा मुबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो. या शेतीच्या समस्या जिराईत शेतीच्या समस्यांपेक्षा वेगळ्या आहेत. उदा., बागायती शेतीपुढील सर्वांत महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे जलोत्सारणाने काळजीपूर्वक रीत्या अतिरिक्त मृदा-जल काढून टाकून जमिनीची उत्पादनक्षमता टिकविणे. याउलट दुर्जल शेतीत पाण्याचा थेंब न् थेंब वाचवून त्याचा उत्पादनवाढीसाठी उपयोग करणे ही समस्या असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/शेती" पासून हुडकले