"बाबा राम रहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ५१:
9. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कोर्टातून राम रहीमला पळवून नेण्याचा कट होता. दत्तक मुलगी हनीप्रीतसोबत तो पळून जाणार होता असाही खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलीस हनीप्रीतचा कसून शोध घेत आहेत.
10. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती. हनीप्रीतकडे असलेली एक लाल बॅग म्हणजे हिंसा भडकावण्याचा इशारा होता असाही खुलासा आता झाला आहे. <ref>http://www.lokmat.com/national/new-revelation-related-ram-rahim-and-dera-sacha-sauda/</ref>
सीबीआय कोर्टासमोर गुरमीत राम रहीम सिंगला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी करण्याची शक्यता
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी सीबीआय कोर्टाकडे करण्याची शक्यता आहे.
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी सीबीआय कोर्टाकडे करण्याची शक्यता आहे. गुरमीत राम रहीम सिंग याला बलात्कार प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आज तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश गुरमीत राम रहीम सिंगला शिक्षा सुनावणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बलात्कार प्रकरणात बाबा राम रहीमला दोषी ठरवण्यात आले आहे, ते दुर्मिळातील दुर्मिळ असे प्रकरण आहे व यामध्ये कठोरातील कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे. हे केवळ बलात्काराचे प्रकरण नाही तर पीडितेचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचे हे गंभीर प्रकरण आहे. 15 वर्षांपूर्वी दोन महिला अनुयायांवरील बलात्काराप्रकरणी बाबा राम रहीम सिंगला दोषी ठरवण्यात आले आहे.
 
एका वरिष्ठ अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, 'सामान्य प्रकरणापेक्षा हे प्रकरण वेगळे आहे. यात पीडितेसोबत अनेकदा जबरदस्ती करण्यात आली आहे'. सीबीआयनं कोर्टात केलेल्या युक्तीवादानुसार, गुरमीत राम रहीम सिंगनं 2 महिला अनुयायांवर अनेकदा बलात्कार केला. दरम्यान, अधिका-यांनी असेही सांगितले की, बाबा राम रहीम आणि पीडित महिलांमध्ये जवळचे संबंध होते. विश्वास व श्रद्धेचे हे प्रकरण होते. या महिला राम रहीमला गुरू मानत होत्या. मात्र राम रहीमने महिला अनुयायांसोबत आपल्या आध्यात्मिक ताकदीचा गैरवापर केला. सोबतच या पीडित महिलांचा विश्वासघातही केला. यामुळेच गंभीर स्वरुपाचा हा गुन्हा असून यात कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, असेही अधिकारी म्हणालेत
 
गुरमीत राम रहीमला पळवण्याचा होता कट
दरम्यान बाबा गुरमीत राम रहीमयांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर त्यांना कोर्टाच्या आवारातून पळवून नेण्याचा कट होता, अशी माहिती समोर आली आहे. एकूण सात जणांनी मिळून राम रहीम यांना पळवून नेण्याचा कट आखला होता. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हरियाणाच्याच काही पोलिसांचाही समावेश होता. तर इतर दोन जण खासगी सुरक्षा रक्षक होते. मात्र या सात जणांची तिथे तैनात असलेल्या इतर पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांना कटाचा अंदाज आल्यामुळे राम रहीमला पळवण्याचा प्लॅन फसला. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण सात जणांचा बाबाला पळवून नेण्याचा कट होता. यामध्ये पाच हरियाणा पोलिसांचाही समावेश होता. हे पाचजण गेल्या 5 ते 6 वर्षांपासून बाबाच्या झेड प्लस सुरक्षेचा हिस्सा होते. याशिवाय इतर दोन जण हे खासगी सुरक्षा रक्षक होते. हेड कॉन्स्टेबल अजय, कॉन्स्टेबल राम सिंह, हेड कॉन्स्टेबल विजय सिंह, सब इन्स्पेक्टर बलवान सिंह आणि कॉन्स्टेबल किशन कुमार या पाच हरियाणा पोलिसांचा यामध्ये समावेश होता. तर प्रितम सिंह आणि सुखबीर अशी इतर खासगी सुरक्षा रक्षक असलेल्यांची नावं आहेत.
 
समर्थकांनी एकत्रित यावे, यासाठी फोन कॉल करण्यात आले-
पळवून नेण्याचा प्रयत्न फसल्यानंतर डेरा समर्थकांनी पंचकुलामध्ये एकत्रित व्हावे यासाठी फोन करण्यात आले होते. समर्थकांनी काय करावे, याबाबतच्या सूचनाही त्यांना दिल्या जात होत्या. न्यायालयाच्या आवारात येऊ नये कारण तेथे जास्त फौजफाटा आहे, अशा सूचनाही समर्थकांना देण्यात आल्या होत्या.
 
सीबीआय कोर्टाने डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर त्यांना सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. <ref>http://www.lokmat.com/national/possibility-life-imprisonment-gurmeet-ram-rahim-singh-cbi-court-likely-be-sentenced-life/</ref>