"बाबा राम रहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,५६२ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
15 ऑगस्ट 1967 रोजी बाबा गुरमीत राम रहीम यांचा जन्म झाला. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील गुरुसर मोदिया येथे एका शीख कुटुंबात ते जन्माला आले. वयाच्या सातव्या 31 मार्च, 1974 रोजी तत्कालीन डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांनी राम रहीम असं त्यांचं नाव ठेवलं. 23 सितंबर, 1990 रोजी शाह सतनाम सिंह यांनी देशभरातील अनुयायांचं सत्संग बोलावलं आणि गुरमीत राम रहीम सिंह यांना आपला उत्तराधिकारी घोषीत केलं. राम रहीम यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांनी दोन मुलींशिवाय हनीप्रीत हिला दत्तक घेतलं आहे.
 
==संदर्भ==
दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या नातेवाईकांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. भूपिंदर सिंह गोरा यांनी सांगितलं आहे की, शारिरीक संबंधांचा आरोप झाल्यानंतर राम रहीम हायप्रोफाईल तरुणींना सिरसा येथे बोलवत असे. इतकंच नाही तर कधी कधी तरुणींसाठी महिन्यातले 15 ते 20 दिवस मुंबईला शिफ्ट होत असे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत भूपिंदर सिंह गोरा यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे.
 
तरुणींची व्यवस्था करण्यापासून ते पुढील सर्व गोष्टींची जबाबदारी हनीप्रीतवर असे. त्यांनी सांगितलं की, राम रहीम जास्तीत जास्त वेळ महिलांमध्येच घालवत असे. लाखो महिला अनुयायी उपस्थित असतानाही राम रहीम खुलेपणाने नग्न सेक्स वर्कर्ससंबंधी चर्चा करायचा.
 
भूपिंदर सिंह गोरा यांनी सांगितल्यानुसार, राम रहीम प्रेमाच्या तीन पद्धती आहेत असं सांगायचा. यानुसार मिजाजी (वन नाइट स्टँण्ड), हाकिकी (खरं प्रेम) आणि रुहानी (दैवी प्रेम) असे तीन प्रकार आहेत असं राम रहीम सांगायचा. 'गुहेत एकदा एका महिला किंवा तरुणीची भेट घेतल्यानंतर पुन्हा तो तिला भेटायचा नाही. सोबतच त्याला भेटण्यासाठी इच्छुक असणा-या महिलांवर त्याची नजर असायची. सुरक्षेसाठी तैनात कर्मचारी बाबा धार्मिक गोष्टींमध्ये व्यस्त असल्याचं कारण महिलांना देत असते. पण खरं सांगायचं तर आजपर्यंत त्याने साधं एका धार्मिक पुस्तकालाही हात लावलेला नाही', असं भूपिंदर सिंह गोरा यांनी सांगितंल आहे.<ref>http://www.lokmat.com/national/ram-rahim-never-talked-about-religious-book-says-naked-sex-workers-front-millions-women/</ref>
==संदर्भ==