"बाबा राम रहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४८ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्ट आज निकाल देणार आहे.800 गाड्यांच्या ताफ्यासह राम रहीम पंचकूला न्यायालयासाठी रवाना झाले आहेत.
========== बाबा राम रहीम =============
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्ट आज निकाल देणार आहे.800 गाड्यांच्या ताफ्यासह राम रहीम पंचकूला न्यायालयासाठी रवाना झाले आहेत.
 
राम रहीमवर आरोप करणा-या बलात्कार पीडितेने तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्रं लिहिलं होतं. या पत्रात बाबाने रात्री गुफेमध्ये बोलावून दुष्कर्म केल्याचं तिने म्हटलं होतं. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास 100 एकर परिसरात पसरलेल्या गुरमीत राम रहीम यांच्या आश्रमाच्या मधोमध काचेचं एक भवन आहे, त्याला बाबाची गुफा असं म्हटलं जातं.
जाणून घेऊ राम रहीमविषयी-
गुरुमीत राम रहीम यांच्यावर बलात्कारापासून खुनाचे व खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. त्यांनी आपल्या ४00 पुरुष अनुयायांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आश्रमातील साध्वीसंदर्भात अनुयायांना लैंगिक आकर्षण वाटू नये, यासाठी तसे केले होते, असे सांगण्यात येते. डेरा सच्चा सौदा पंथाच्या बेकायदा कामाविषयी वृत्तपत्रात लिखाण करणा-या पत्रकाराची हत्या त्यांच्याच सांगण्यावरून झाली होती, असे बोलले जाते. शीख समाजाचे गुरू गोविंद सिंह यांच्यासारखी वेशभूषा राम रहीम यांनी केल्याने त्या समाजाने संताप व्यक्त केला होता.
शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण : राम रहीम यांच्यावरील चित्रपटातील बराच भाग आक्षेपार्ह असल्याने त्यास संमती देण्यास सेन्सॉर बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्ष लीला सॅमसन यांनी २0१५ साली नकार दिला होता. त्या चित्रपटास संमती द्यावी, यासाठी केंद्र सरकार आपल्यावर दबाव आणत आहे, अशी तक्रारही श्रीमती सॅमसन यांनी केली होती. राम रहीम यांच्या आश्रमात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात असल्याच्या तक्रारीनंतर हरयाणा उच्च न्यायालयाने त्याची नियमित तपासणी करावी, असे आदेश दिले होते.<ref>http://www.lokmat.com/national/baba-ram-rahim-kept-daughter-room-made-me-sleep-outside/</ref>
 
कोण आहे बाबा गुरमीत राम रहीम-
15 ऑगस्ट 1967 रोजी बाबा गुरमीत राम रहीम यांचा जन्म झाला. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील गुरुसर मोदिया येथे एका शीख कुटुंबात ते जन्माला आले. वयाच्या सातव्या 31 मार्च, 1974 रोजी तत्कालीन डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांनी राम रहीम असं त्यांचं नाव ठेवलं. 23 सितंबर, 1990 रोजी शाह सतनाम सिंह यांनी देशभरातील अनुयायांचं सत्संग बोलावलं आणि गुरमीत राम रहीम सिंह यांना आपला उत्तराधिकारी घोषीत केलं. राम रहीम यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांनी दोन मुलींशिवाय हनीप्रीत हिला दत्तक घेतलं आहे.
 
==संदर्भ==