"बाबा राम रहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ========== बाबा राम रहीम ============= डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमी...
(काही फरक नाही)

१५:१४, २ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

==== बाबा राम रहीम =======
            डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्ट आज निकाल देणार आहे.800 गाड्यांच्या ताफ्यासह राम रहीम पंचकूला न्यायालयासाठी रवाना झाले आहेत. 

राम रहीमवर आरोप करणा-या बलात्कार पीडितेने तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्रं लिहिलं होतं. या पत्रात बाबाने रात्री गुफेमध्ये बोलावून दुष्कर्म केल्याचं तिने म्हटलं होतं. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास 100 एकर परिसरात पसरलेल्या गुरमीत राम रहीम यांच्या आश्रमाच्या मधोमध काचेचं एक भवन आहे, त्याला बाबाची गुफा असं म्हटलं जातं.

गुफेमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन-तीन दरवाजे आहेत. बाबाची गाडी थेट या दरवाजांपर्यंत पोहोचते. गुफेत प्रवेश करताना बायोमेट्रिक सिस्टिमचा वापर केला जातो. गुफेच्या रस्त्यात बंदुक घेऊन काही लोक तैनात असतात. बाबाच्या हजारो महिला भाविकांपैकी काही खास भाविकांनाच या गुफेत प्रवेश करण्याचा अधिकार आहे. या महिला भाविक साध्वीसारख्या वेशभूषेत असतात. बाबाला जेवण भरवण्यापासून सकाळ-संध्याकाळ स्टेजवर नेण्या-आणण्याचं काम या महिला भाविक करतात. बाबाच्या प्रवचनाच्या वेळीही या महिला भाविकांना बसण्याची विशेष सोय असते. प्रवचन हॉलमधील सर्व व्यवस्था या महिला भाविकच सांभाळतात तर हॉलच्या बाहेरील भागात पुरूष कारसेवक काम करतात.

बाबाच्या या गुफेत विशेष व्यक्तींची भेट घेण्यासाठी एक रूम आहे. अनेक देशांमध्ये थेट बोलता यावं यासाठी याच रूममध्ये हॉटलाइन उपलब्ध आहे. या गुफेत ऐशोआरामाची प्रत्येक वस्तू आहे. बाबाच्या आश्रमात सीसीटीव्ही तर आहेच शिवाय एक कंट्रोल रूम आहे. या रूममध्ये देशातील सर्व चॅनलची मॉनेटरिंग आणि बाबाशी संबंधित बातम्या रेकॉर्ड करण्याची सिस्टीमही आहे.