"गिधाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
निरुपयोगी वाक्य काढले.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २१:
 
== गिधाडांचे सांघिक कौशल्य ==
गिधाडांच्या अनेक जाती आहेत. या सर्व जातींचे कार्य एकच म्हणजे मृतदेहांचा फडशा हे असले तरी ह्या सर्व जाती एकमे़कांच्या साह्याने काम करत असतात. ही सर्व गिधाडे मुख्यत्वे उंच आकाशात विहार करत असतात व साधारणपणे कळपात एकमेकांपासून अंतर ठेऊन विहार करणे पसंत करतात. भिन्नभिन्न जातींची गिधाडेसुद्धा एकत्र विहार करतात. प्रत्येक गिधाडाची नजर इतर गिधाडांवर असते. या गिधाडांमधील एक इजिप्शियन गिधाड नावाची जात आहे. ह्या जातीचे डोळे अत्यंत तीक्ष्ण असतात. अनेक किलोमीटर अंतरावरील शिकार किंवा खाद्य हे सहज हेरू शकतात. बहुतेक गिधाडांची याच गिधाडावर नजर असते. जेव्हा हे गिधाड खाद्य हेरते तेव्हा ते साहजिकच खाद्य जिथे असेल तिथे उतरते. त्याला buddy उतरताना पाहून इतर गिधाडे पण उतरू लागतात व सगळ्या गिधाडांना खबर मिळ्ते, की खाद्य मिळाले आहे. खाद्यापाशी पोहोचल्यावर गिधाडे बराच वेळ वाट बघत असतात. ही सर्व गिधाडे राज गिधाड येण्याची वाट बघत असतात. मृतदेहांची कातडी बहुधा अत्यंत जाड झालेली असते व बहुतांशी गिधाडांना ती भेदणे आवाक्याबाहेरचे असते. राज गिधाडाने येऊन पहिले काम फत्ते केल्यावर मग बाकी गिधाडांचे काम चालू होते, व पाहता पाहता पूर्ण मृतदेहाचा अक्षरक्षः फडशा पडतो. मृतदेहाची हाडे सोडून इतर सर्व भाग पचवण्याची क्षमता गिधाडांमध्ये असते.
 
== गिधाडांच्या भारतात आढळणाऱ्या जाती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गिधाड" पासून हुडकले