"कुंदन लाल सैगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०:
१९३१ साली कलकत्त्यात असताना कुंदनलाल सैगल यांनी अनेक छोट्या-मोठ्या मैफलींमध्ये गाणी गायिली. त्यांच्या गायनाने प्रभावित होऊन बी. एन्. सरकार यांनी सैगल यांना ‘न्यू थिएटर्स’साठी करारबद्ध केले. १९३२मध्ये सैगल यांची भूमिका असलेले मोहब्बत के आँसू (उर्दू चित्रपट), सुबह का तारा व जिंदा लाश हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले; पण ते फारसे चालले नाहीत.
 
मात्र १९३३ मध्ये पूरन भगत या चित्रपटामुळे गायक-अभिनेते अशी सैगल यांची ख्याती सर्वत्र पसरली. या चित्रपटातील रायचंद (आर.सी.) बोराल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायिलेली भजने लोकप्रिय ठरली. चंडीदास या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी होती. दिग्दर्शक पी.सी. बरुआंच्या देवदास (१९३५) या चित्रपटातील सैगल यांची नायकाची भूमिका व गाणी अत्यंत गाजली व त्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटातील ‘बालम आवो बसो मोरे मन मे’ व ‘दुख के अब दिन बीतत नही’ यांसारखी त्यांची गाणी अजरामर ठरली. सैगल यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवले व ‘न्यू थिएटर्स’ निर्मित सात बंगाली चित्रपटांत भूमिका केल्या, तसेच तीस बंगाली गीते गाऊन बंगाली रसिकांची वाहवा मिळवली. ‘एक बंगला बने न्यारा’ (प्रेसिडेंट), ‘करू‘करूं क्या आस निरास भई’ (दुष्मन), ‘सो जा राजकुमारी सो जा’ (जिंदगी, १९४०), ‘बाबूल मोरा’ (स्ट्रीट सिंगर) इ. लोकप्रिय गाण्यांनी त्यांनी रसिकांची मने जिंकली भारतीय चित्रपट-संगीताचा वारसा समृध्दसमृ्द्ध करणारी यांसारखी अनेक गीते सैगल यांनी गायिली. १९४० पर्यंत सैगल ‘न्यू थिएटर्स’मध्ये होते. या काळात आर.सी. बोराल, पंकज मलिक व तिमिर बरन या ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकांची अनेक अजरामर गाणी सैगल यांनी गायिली.
 
==मुंबईत आगमन==
ओळ ८६:
ज्यांनी सैगल यांना कधीही पाहिले नाही असे अनेकजण सैगल यांच्या गायकीवर फिदा असतात. असा गायक पुन्हा होणे नाही अशीच सर्वांची भावना असते. पुण्याचे श्रीधर रानडे हे असेच सैगलवर एकलव्यासारखी गुरुभक्ती करणारे रसिक. त्यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त २५ नोव्हेंबर २०१७ रोजी कोथरूड येथील गणंजय सोसायटीतील स्वतःच्या मालकीच्या ’साहस’ या बंगल्यामध्ये कुंदनलाल सैगल स्मृती भवन साकारले आहे.
 
साखर कारखान्यासाठी लागणारे विशिष्ट पाईप तयार करणे हा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या श्रीधर रानडे यांचा व्यवसाय. पणत्यांचा त्यांनीआवाज सैगलच्या आवाजाशी मिळताजुळ्ता आहे असे कुणीतरी म्हटल्यानंतर, रानडे यांनी आयुष्यभर सैगल यांच्या गीतांचा प्रचार आणि प्रसार करणॆकरणे हेच जीवनाचे ध्येय मानले. दरवर्षी सैगल यांच्या ११ एप्रिल या जन्मदिवशी आणि १८ जानेवारी या स्मृतिदिनी श्रीधर रानडे हे १०,००० ते १५,००० भाडे देऊन एखाद्या सभागृहात सैगल यांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रम करत. आता त्यासाठी त्यांचे स्वतःचे सभागृह आहे.