"कुंदन लाल सैगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:अत्यंत छोटी पाने काढण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =

'''कुंदनलाल सैगल''' (जन्म : ११ एप्रिल १९०४,; मृत्यू : १८ जानेवारी १९४७) हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय बोलपटांतील एकसर्वात लोकप्रिय गायक अभिनेते होते. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉइस’ म्हणायचे. सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या गैरफिल्मी गझलासुद्धा फार श्रवणीय आहेत. ‘बाबुल मोरा’ हे स्ट्रीट सिंगर चित्रपटातील गाणे अजूनही लोकांना फार आवडते.

कुंदनलाल सैगल यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. त्या सैगल यांना बालपणी धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन, यांसारख्या पारंपरिक शैलीत गायल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयात सैगल यांच्यावर झाले. जम्मू येथील रामलीलांमध्ये सैगल अधूनमधून सीतेची भूमिका करीत असत. त्यांचे वडील सेवानिवृत्तीनंतर पंजाबमधील जालंदर येथे स्थायिक झाल्याने सैगल यांचे बालपण तेथेच गेले. त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहिले.
ओळ ७०:
* सुबह का तारा
* स्ट्रीट सिंगर

==कुंदनलाल सैगल यांना मिळालेले सन्मान==
* बी. एन्. सरकार यांनी सैगल यांच्या जीवनावर आधारित अमर सैगल हा अनुबोधपट १९५५ मध्ये केला होता.
* मराठी कवी कुसुमाग्रजांनी या सूरसम्राटाला मानवंदना देताना म्हटले होते-

अशीच संगीते आळवी तुझी कलावंता,

घडीभर जागव रे अमुची अशीच मानवता..

* सैगल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतात, आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर अनेक कार्यक्रम होतात. सिलोन रेडियोवर सकाळी ०७-३०- ते ०८०० या जुन्या चित्रपट गीतातील कार्यक्रमात शेवटचे गीत सैगल यांचे असे.

तसेच लोककवी मनमोहन एका कवितेत सैगलांबद्दल म्हणतात-

तुझ्याच कंठामध्ये अवचित

मधमाशी घे ‘मोहोळ’ बांधुनी

बुलबुल बसले बनात रुसुनी।

==पुण्यातील कुंदनलाल सैगल स्मृती भवन==
सैगल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतात, आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर अनेक कार्यक्रम होतात. सिलोन रेडियोवर सकाळी ०७-३०- ते ०८०० या जुन्या चित्रपट गीतातील कार्यक्रमात शेवटचे गीत सैगल यांचे असे. ज्यांनी सैगल यांना कधीही पाहिले नाही असे अनेकजण सैगल यांच्या गायकीवर फिदा असतात. असा गायक पुन्हा होणे नाही अशीच सर्वांची भावना असते. पुण्याचे श्रीधर रानडे हे असेच सैगलवर एकलव्यासारखी गुरुभक्ती करणारे रसिक. त्यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त २५ नोव्हेंबर २०१७ रोजी कोथरूड येथील गणंजय सोसायटीतील स्वतःच्या मालकीच्या ’साहस’ या बंगल्यामध्ये कुंदनलाल सैगल स्मृती भवन साकारले आहे.

साखर कारखान्यासाठी लागणारे विशिष्ट पाईप तयार करणे हा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या श्रीधर रानडे यांचा व्यवसाय. पण त्यांनी आयुष्यभर सैगल यांच्या गीतांचा प्रचार आणि प्रसार करणॆ हेच जीवनाचे ध्येय मानले. दरवर्षी सैगल यांच्या ११ एप्रिल या जन्मदिवशी आणि १८ जानेवारी या स्मृतिदिनी श्रीधर रानडे हे १०,००० ते १५,००० भाडे देऊन एखाद्या सभागृहात सैगल यांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रम करत. आता त्यासाठी त्यांचे स्वतःचे सभागृह आहे.