"कुंदन लाल सैगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''कुंदनलाल सैगल''' (जन्म : ११ एप्रिल १९०४,; मृत्यू : १८ जानेवारी १९४७) हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय बोलपटातीलबोलपटांतील एक लोकप्रिय गायक आणि अभिनेते होते.
 
कुंदनलाल सैगल यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. त्या सैगल यांना बालपणी धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन, यांसारख्या पारंपरिक शैलीत गायल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयात सैगल यांच्यावर झाले. जम्मू येथील रामलीलांमध्ये सैगल अधूनमधून सीतेची भूमिका करीत असत. त्यांचे वडील सेवानिवृत्तीनंतर पंजाबमधील जालंदर येथे स्थायिक झाल्याने सैगल यांचे बालपण तेथेच गेले. त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहिले.
ओळ ६१:
* सुबह का तारा
* स्ट्रीट सिंगर
 
==पुण्यातील कुंदनलाल सैगल स्मृती भवन==
सैगल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतात, आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर अनेक कार्यक्रम होतात. सिलोन रेडियोवर सकाळी ०७-३०- ते ०८०० या जुन्या चित्रपट गीतातील कार्यक्रमात शेवटचे गीत सैगल यांचे असे. ज्यांनी सैगल यांना कधीही पाहिले नाही असे अनेकजण सैगल यांच्या गायकीवर फिदा असतात. असा गायक पुन्हा होणे नाही अशीच सर्वांची भावना असते. पुण्याचे श्रीधर रानडे हे असेच सैगलवर एकलव्यासारखी गुरुभक्ती करणारे रसिक. त्यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त २५ नोव्हेंबर २०१७ रोजी कोथरूड येथील गणंजय सोसायटीतील स्वतःच्या मालकीच्या ’साहस’ या बंगल्यामध्ये कुंदनलाल सैगल स्मृती भवन साकारले आहे.