"इंका साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) No edit summary |
साचा |
||
ओळ २४:
''इंका'' याचा अर्थ क्वेचुआमध्ये ''शासक'' किंवा ''देव'' असा होतो. ही व्याख्या सम्राटांच्या घराण्याबाबत वापरली जात असे. स्पॅनिशांनी त्याचा अर्थ संपूर्ण साम्राज्य असा लावला. ''Imperio inca'' म्हणजे स्पॅनिशांनी जे राष्ट्र जिंकून घेतले ते होय.
{{साम्राज्ये}}▼
==
दक्षिण अमेरिका हा विस्तीर्ण खंड आहे.मंका आर्य याने अन्डीज पर्वतात कुस्को येथे राजधानी स्थापन केली.त्याने आपल्या बहिणीशीच विवाह केला.ओक्लोन अम्मा ही इंका साम्राज्याची पहिली राणी झाली.पाचव्या पिढीतील कपश उपांकी याने राज्याचा विस्तार केला.
आठव्या पिढीतील राजा वीरकोच याने सर्व जन - जातींना साम्राज्यात सामावून घेतले.त्याचे सर्वात महत्वाचे कार्य हे धार्मिक क्षेत्रात होते. जनजातींचा धार्मिक नेता आणि शासकीय नेते यांची त्याने एक परिषद भरवली.देवतांची श्रेणी निश्चित केली. धर्मगुरूंचे अधिकार निश्चित केले. सगळे पंथ संप्रदाय एका सूत्रात बांधले गेले. १४२८ मध्ये कुशी इंका हा वीरकोचाचा पुत्र गादीवर आला. त्याच्या काळात भौगोलिक दृष्ट्या साम्राज्याचे त्याने चार विभाग केले.शीघ्र संदेशवहनाची व्यवस्था त्याने केली.केचुआ ही त्याची राज्यभाषा होती. शेतीसाठी पाणीपुरवठा योजना,मंत्रालय , शासकीय नोंदणी ,शीरगणती अशा सर्वच बाबतीत इंका साम्राज्य आघाडीवर होते.
Line ३६ ⟶ ३५:
इंका तत्वज्ञ लोकांना “अमौतस” म्हणत असत.ही मंडळी मौखिक परंपरेने आलेली आख्याने,पुराण,इतिहास कथन करत असत.आत्म्याला ते “वाका” म्हणत.पूर्वजांचे आत्मे सद्गुणी लोकांना मदत करतात अशी त्यांची श्रद्धा होती.त्यांच्या प्रार्थना आणि सूक्ते मानवी कल्याणाचा विचार करणारी होती. इ.स. १५३२ मध्ये या साम्राज्यावर स्पेनिश आक्रमण झाले.पिझारो हा राजा इंकाच्या राजाला ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी आग्रह करू लागली. त्याने नकार दिल्याने पिझारोने त्याला ठार मारले आणि इंका साम्राज्यावर ख्रिस्ती धर्माची स्थापना केली.<ref>डाॅॅ.हेबाळकर शरद, भारतीय संंस्कृृतीचा विश्वसंंचार</ref>
▲{{साम्राज्ये}}
[[वर्ग:साम्राज्ये]]
[[वर्ग:पेरूचा इतिहास]]
|