"कोल्हापूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ८६:
 
== उद्योग ==
कोल्हापुरातील मुख्य उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय होत. याशिवाय कोल्हापूर शहराजवळ लोहकाम ( ज्यात मुख्यत: मोटारींचे भाग तयार केले जातात अशा फाउंड्रीज) आणि कोल्हापुरी चपला बनवण्याचे बरेच छोटे कारखाने आहेत. [[इचलकरंजी]] या शहरात बरेच वस्त्रकामाशी संबंधित उद्योग आणि कारखाने आहेत. हे कारखाने तयार मालाची थेट निर्यात करतात. [[हुपरी]] हे गाव चांदीकामासाठी प्रसिद्ध आहे.
सहकार व उद्योगधंदे - कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते. सहकारी चळवळ भारतात व महाराष्ट्रात रुजण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात (१९१२-१३) कोल्हापूर संस्थानात सहकारी संस्था अधिनियम राजर्षी शाहू महाराजांनी लागू केला होता. तसेच सहकार तत्त्वाच्या अगदी जवळ जाणरी भिसी पद्धत किंवा पुष्टीफंड योजना १९ व्या शतकात फक्त कोल्हापूर जिल्ह्यात अस्तित्वात होती. भिशी पद्धत सहकारी बँकेची छोटी प्रतिकृती असून गेली २०० वर्षे जिल्ह्यात अस्तित्वात आहे. याचाच परिणाम म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यात हजारो सहकारी संस्था (सहकारी बँका, पतसंस्था, दूध सोसायट्या, सहकारी साखर कारखाने, शेतकी सहकारी संस्था... इ.) कार्यरत आहेत.