"चित्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भसूची --> संदर्भयादी (via JWB)
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
ओळ १९:
एकेकाळी चित्ता हा अफ़्रिका [[युरेशिया]] व भारतीय उपखंडातील मोठ्या भूभागावर पसरला होता परंतु आज चित्याचे आढळस्थान केवळ अफ़्रिकेच्या गवताळ प्रदेशापुरते मर्यादीत राहिले आहे. याला मुख्य कारण चित्याचे नष्ट झालेले वसतीस्थान. चित्याचे मुख्य वसतीस्थान जे [[गवताळ प्रदेश]] आहे त्यावर शेती व इतर कारणासाठी मानवी अतिक्रमण झाले. तसेच चित्याचे वैशिष्ट्य जे अतिवेग आहे तो चित्याच्या प्रगतीत खरेतर मारक ठरला. चित्याने [[उत्क्रांती]] मध्ये वेग मिळवला खरे परंतु त्याने शारीरिक ताकद गमावली. त्यामुळे बहुतेक वेळा चित्ता त्याच्या पिलांचे इतर भक्षकांपासून अथवा त्याने मिळवलेल्या भक्षाचे रक्षण करू शकत नाही. त्यामुळे चित्याची बऱ्याच ठिकाणी संख्या कमी झाली.भारतातील चित्ता ज्याला [[अशियाई चित्ता]] म्हणत त्याचा भारतात एके काळी मोठ्या भूभागावर वावर होता. चित्याची बंदीवासात वीण होत नाही असा अनुभव आहे. भारतातील शेवटचा जंगली चित्ता १९५१ मध्ये [[आंध्र प्रदेश|आंध्रप्रदेशात]] दिसला. यानंतर भारतातून जंगली चित्ता दिसल्याची नोंद नाही. त्यामुळे भारतातून चित्ता नामशेष झाला आहे<ref>[http://en.wikipedia.org/w/index.php?title=Asiatic_Cheetah&oldid=216803959 इंग्रजी विकिपीडीया भारतीय चित्ता]</ref>. महाराष्ट्रातील मुख्यत्वे मराठवाडा, विदर्भ व पश्विम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात चित्ता होता अशी नोंद आहे. विदर्भातील शिकाऱ्यांनी चित्याच्या शिकारी केल्याच्या नोंदी आहेत<ref>अरण्यपुत्र - ले. सुरेशचंद्र वारघडे</ref>. आशियाई चित्याची आज केवळ [[इराण]] मध्ये जवळपास पन्नास इतकी संख्या राहिली आहे. अधे मधे [[बलुचिस्तान]] मध्ये दिसण्याच्या घटना घडतात.
 
अफ़्रिकेतील मुख्यत्वे सव्हानाच्या गवताळ प्रदेशात अजूनही चित्याचे अस्तित्व आहे जेथे खाद्याची मुबलकता आहे. अशा भागात अजूनही चित्ते मुबलक आढळतात. [[केनिया]],[[झिंबाब्वे]], [[बोटस्वाना]],[[दक्षिण आफ्रिका]], [[नामिबिया]], [[युगांडा]] इत्यादी देशात आढळतो.चित्ता खूप वेगाने पळतो.
 
सुयोग
"https://mr.wikipedia.org/wiki/चित्ता" पासून हुडकले