"ढेकूण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''ढेकूण''' हा निशाचर व रक्तशोषक कीटक आहे. मानवाखेरीज उंदीर, सस...
 
No edit summary
ओळ ७:
अनुकूल परिस्थितीत सुमारे २१ अंश सेल्सिअस तापमान व भरपूर अन्नपुरवठा असताना दिवसाला ३ ते ४ या हिशोबाने मादी सरासरीने २०० किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालते. १० अंश सेल्सिअस खालच्या तापमानात मादी अंडी घालीत नाही. उपासमार झालेली मादी अंडी घालणे बंद करते. अंडी लांबट, पांढरट, डोळ्यांनी सहज दिसतील एवढी मोठी असून त्यांच्या एका टोकाला स्पष्ट टोपी असते. ती फर्निचर, भिंती इत्यादींच्या फटींत चिकटवून ठेवलेली असतात. ६ ते १७ दिवसांत अंडी फुटून त्यांतून पिले बाहेर पडतात. पिले प्रौढासारखी दिसतात पण फिक्या पिवळ्या रंगाची असतात. पाच वेळा कात टाकून पिलांना प्रौढावस्था प्राप्त होते. अनुकूल तापमानात पिलाला प्रौढावस्था प्राप्त होण्यास ४ ते ६ आठवडे लागतात. एका वर्षात ढेकणाच्या तीन किंवा त्यांपेक्षा जास्त पिढ्या होतात.
 
== राहण्याचयाराहण्याच्या व लपण्याच्या जागा ==
दिवसा ढेकूण गाद्या, उश्या, कपाटे, फर्निचर, भिंती इत्यादींच्या फटींत लपून बसतात. ते आगगाडीचे डबे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, हॉटेले, सैन्याच्या बरॅकी इत्यादी ठिकाणी विशेष आढळतात. रात्री तसेच दिवसाही अंधाराच्या जागी ते माणसाला उपद्रव देतात. माणसाचे [[रक्त]] शोषून घेतल्यावर ते आपल्या लपण्याच्या जागेत जाऊन बसतात व अन्नपचन करतात. अन्नपचनासाठी त्यांना बरेच दिवस लागतात. ढेकूण अन्नाशिवाय तीन महिन्यांपर्यंत जगू शकतात.
 
माणसाचे तापमान व त्याच्या बसण्याचा दाब या दोन संकेतांनी ढेकूण लपलेल्या फटीतून बाहेर येऊन माणसाला चावा घेतो. चावण्यापूर्वी तो लाला ग्रंथींचा स्राव चावण्याच्या जागेवर सोडतो व नंतर आपल्या शुंडाने (सोंडेसारख्या अवयवाने) छिद्र करतो. स्रावामुळे छिद्र करण्याची वेदना जाणवत नाही व रक्त शोषताना ते गोठत नाही. ढेकणाच्या चाव्याचा परिणाम लगेच दिसून येत नाही. परंतु त्याच्या विषामुळे थोडीशी खाज सुटणे, आग होणे व गांधी येणे हे परिणाम वेगवेगळ्या व्यक्तींत कमीअधिक प्रमाणात दिसून येतात. काही व्यक्तींत हे परिणाम एका आठवड्यापेक्षा जास्त काळही टिकतात. ढेकणामुळे विविध रोगांचा प्रसार होत असावा असे शास्त्रज्ञांना वाटते, परंतु अजून तसा सबळ पुरवापुरावा मिळालेला नाही.<ref>{{cite encyclopediasantosh | title=ढेकूण | encyclopedia=मराठी विश्वकोश | publisher=महाराष्ट्र राज्य मराठी विश्नकोश निर्मिती मंडळ | accessdate=२५ डिसेंबर २०१७ | author=ज.वि. जमदाडे | edition=आॅनलाईन | location=मुंबई | दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand7/index.php/component/content/article?id=12727}}</ref>
 
== बंदोबस्त ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ढेकूण" पासून हुडकले