"ऊर्मिला पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३४:
 
एकांकिका, समीक्षा असे लेखनप्रकार हाताळणाऱ्या ऊर्मिला पवार यांच्या ' आयदान ' या आत्मकथनाने मराठी साहित्यातील आत्मकथेला ऐतिहासिक वळण मिळाले. आज दलित आत्मकथनांच्या प्रवासाची चर्चा 'बलुतं ते आयदान' अशीच केली जाते. ऊर्मिला पवार यांच्या कथा, आत्मकथनाची इंग्रजी, स्वीडिश या भाषांमध्येही भाषांतरे झाली आहेत.
 
 
==जीवनपट==
महाराष्ट्र राज्यातील [[कोकण]] ह्या प्रांतात पवार यांचा जन्म झाला. त्यांच्या महार समाजातील लोक परंपरेने [[बांबू]]<nowiki/>च्या कामट्यांची सुपे, रोवळ्या, टोपल्या विणण्याचे काम (आयदानाचे काम) करीत होते.
 
उर्मिला पवार म्हणतात त्यानुसार २००० साली त्यांनी ' अबब! हत्ती ' नावाच्या छोट्यांच्या दिवाळी अंकात एक भाग लिहिला होता. तो छापून आल्यावर बाईंना आणखीन लिहावसे वाटले. 'चौथी भिंत' या पुस्तकात १९८९ साली त्यांनी लिहिलेली 'गोष्ट शैशवाची’ ही गोष्ट छापून आली. त्यानंतर त्या अधिकाधिक लिहू लागल्या.
 
उर्मिला पवारांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. लग्नानंतर त्या जिद्दीने पुढे शिकल्या. त्यांनी आंबेडकरी चळवळीत भाग घेतला, संघटना बांधल्या. त्यांनी मराठी वाङ्‌मय ह्या विषयात पदव्युत्तर पदविका मिळवली.
 
ऊर्मिला पवार पुढे [[महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम खाते|महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात]] नोकरीला लागल्या.(संदर्भ?)
 
उर्मिला पवार ११-१२ वर्षे वयाच्या असताना १९५७ साली त्यांचे कुटुंब बौद्ध झाले.
 
उर्मिला पवार यांच्या ‘आयदान’ या आत्मकथनात्मक पुस्तकाचे [[सुषमा देशपांडे]] या नाट्यरूपांतर केले आहे. या नाटकाचे ५०हून अधिक प्रयोग झाले आहेत.
 
==लिहिलेली पुस्तके==