"देयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,५६८ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
 
उदा. कंपनीवर काही नुकसान भरपाईचा खटला चालू आहे, बँकेच्या [[पतपत्र]] व्यवहारातील देणी, बँक हमी संदर्भातील देणे
 
==द्विनोंदी लेखापालनातील वागणूक==
 
देय खात्यांच्या बाबतीत द्विनोंदी लेखापद्धतीत खालील नियम पाळला जातो.संपत्ती खात्याच्या बाबतीत असणारे नियम इथेही उलट पद्धतीने लागू होतात
 
देणे देऊन टाकले की देयतेचे खाते नावे केले जाते (इंग्लिश : Debit the receiver )
 
देयतेची जबाबदारी आली की देयतेचे खाते जमा केले जाते (इंग्लिश : Credit the giver )
 
==उदाहरण==
 
१) अबक कंपनीने बँकेकडून रुपये १,००,०००/- चे कर्ज घेऊन यंत्र सामुग्री विकत घेतली.
 
या व्यवहारात बँकेला रुपये १,००,०००/- देण्याची जबाबदारी वाढली म्हणून बँकेचे खाते जमा केले जाईल. बँक धनको बनेल.
तसेच यंत्रसामुग्री हि संपत्ती व्यवसायात आली म्हणून यांत्रासामुग्रीचे खाते नावे होईल
 
यंत्रसामुग्री खाते रुपये १,००,०००/- नावे
बँक खाते रुपये १,००,०००/- जमा
 
 
२) अचानक गरज पडली म्हणून श्री क्षयज्ञ यांच्या कडून रुपये ५,०००/- उसने घेतले
 
श्री क्षयज्ञ यांना रुपये ५,०००/- चे देणे देण्याची जबाबदारी वाढली म्हणून त्यांचे खाते जमा होईल
रोख रकमेत रुपये ५,०००/- ची वाढ झाली म्हणून रोख संपत्तीचे खाते नावे होईल
 
रोख खाते रुपये ५,०००/- नावे
श्री क्षयज्ञ रुपये ५,०००/- जमा
 
 
 
 
[[वर्ग:वाणिज्य]]
५९०

संपादने