"राहुल देव बर्मन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(चर्चा | योगदान)
ओळ ३०:
 
==बालपण आणि संगीत शिक्षण==
सचिनदेव बर्मन १९४४ साली कलकत्त्याहून मुंबईत आले. त्यावेळी राहुलदेव पाच वर्षांचा होता. मात्र, चित्रपटसृष्टीत जम बसेपर्यंत कुटुंबाला येथे ठेवण्यात अर्थ नाही, या निर्णयापर्यंत सचिनदेव आले आणि त्यांनी माय-लेकांना पुन्हा कलकत्त्याला धाडले. कलकत्त्यात लहानाचा मोठा झालेल्या राहुलदेवला अभ्यासात कधीच रस नव्हता. त्याचा दिवस सायकल चालवणे, पोहणे, मित्रांसोबत भटकणे यातच संपत असे. कुठेही न शिकता त्याने माऊथ ऑर्गनवर प्रभूत्वप्रभुत्व मिळवले. वेळ काढून कलकत्त्यात येणारे सचिनदेव मुलाच्या करामती पाहून काळजीत पडत. हा मुलगा तर फारच उनाड झाला आहे, मोठेपणी तो काय करणार, असा त्यांचा नेहमीचा सूर असे.. सचिनदांचा हा दृष्टिकोन राहुलदेवच्या शाळेतील बक्षीससमारंभामुळे बदलला. या कार्यक्रमात सचिनदेवांच्या प्रमुख उपस्थितीत राहुलने व्यासपीठावरून माऊथ ऑर्गन सफाईदारपणे वाजवून दाखवला. दुसऱ्या दिवशी सचिनदेवांनी त्याला विचारले, पुढे काय करायचे ठरवले आहेस, यावर ‘मला तुमच्यापेक्षा मोठा संगीतकार व्हायचे आहे’ हे राहुलचे उत्तर सचिनदेवांसाठी अनपेक्षित होते.
 
या प्रसंगानंतर सचिनदेवांनी राहुलला प्रथम ब्रजेन विश्वास यांच्याकडे तबला व पुढे उस्ताद अली अकबर खान यांच्याकडे सरोद शिकण्यासाठी धाडले. त्यानंत राहुलदेवने दाखवलेला झापाटा विलक्षण होता.