"भंते प्रज्ञानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
नंतरच्या काळात धर्मप्रसार व रचनात्मक कार्यासाठी वाहून घेतलेल्या प्रज्ञानंदांनी अनेक संस्थांमध्ये पदे भूषवली. भारती शिक्षण परिषद, श्रावस्तीचे जेतवन महाविद्यालय, भारतीय बौद्ध परिषद व महाबोधी विद्यापरिषद यांचे ते अध्यक्ष होते. देशाच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. ‘मानव उत्थान’ हे पाक्षिक तसेच ‘मध्यम मार्ग’ नावाचे साप्ताहिक त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित व्हायचे. उत्तर प्रदेशातील रायबरेलीला त्यांनी मूळ भारत निवासी वसतिगृहाची स्थापना केली. शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक कार्य करता यावे म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशात व मध्य प्रदेशात मानव उत्थान मिशन नावाचे अभियान प्रभावीपणे राबवले. १९५४ला ब्रह्मदेशातील रंगून येथे झालेल्या सहाव्या धम्मसंगिनी परिषदेसह प्रज्ञानंदांनी देश-विदेशातील अनेक बौद्ध परिषदांमध्ये भाग घेतला. त्यांनी बौद्ध धर्माची महती सांगणाऱ्या पण पाली भाषेत असलेल्या अनेक ग्रंथांचा हिंदीत अनुवाद केला. ‘वज्रसूची’ हा त्यांतील महत्त्वाचा ग्रंथ आहे.
 
==संदर्भ==
<ref>https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/bhante-pragyanand-1595738/</ref>
 
 
[[वर्ग:बौद्ध धर्म]]