"भंते प्रज्ञानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Added new page for "भन्ते प्रज्ञानंद"
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
 
छोNo edit summary
ओळ १:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह लाखो अनुयायांना, १४ ऑक्टोबर १९५६ ला धम्मदीक्षा देणाऱ्या पाच भन्तेंच्या पथकात प्रज्ञानंद होते.
 
प्रज्ञानंद मूळचे श्रीलंकेचे. १८ डिसेंबर १९२७ला कॅण्डी येथे जन्मलेल्या या भन्तेंचे प्राथमिक शिक्षण श्रीलंकेतच झाले. शिक्षण घेत असतानाच त्यांना धर्मप्रसाराचे महत्त्व वाटू लागले. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक अनागरिक धम्मपाल यांनी त्यांना श्रीलंकेतून भारतात आणले. येथे आल्यावर त्यांचा संपर्क उत्तर प्रदेशातील लालकुंवा येथील बुद्ध विहाराचे संस्थापक भन्ते बोधानंद यांच्याशी झाला. उर्वरित शिक्षण उत्तर प्रदेशात पूर्ण करत त्यांनी त्रिपिटीकाचार्य ही पदवी मिळवली. १९४२ला त्यांनी धम्मदीक्षा घेत बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतले. श्रामणेर दीक्षेनंतर त्यांना प्रज्ञानंद हे नाव देण्यात आले.