"बचत खाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,४५६ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
इतरत्र सापडलेला मजकूर
(प्रस्तावना)
(इतरत्र सापडलेला मजकूर)
 
[[पंतप्रधान जनधन योजना|जन धन]] योजने अंतर्गतभारत सरकारने शून्य किमान रक्कम आणि कुठलेही शुल्क नसलेली बचत खाती उघडण्याची सोय भारतीय जनतेला करून दिली. या योजने अंतर्गत कोट्यावधी बचत खाती उघडली गेली.
 
==खातेपुस्तक==
बँकेत [[बचत खाते]] असणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या खात्यावरील व्यवहारांची माहिती देणारे "खाते पुस्तक" दिले जाते. खातेपुस्तकात खातेदाराचे नाव, पत्ता, खात्याचा क्रमांक, खात्याचा प्रकार, बँक शाखेचा पत्ता, शाखेचा IFSC आय एफ एस सी कोड, पेन्शन ऑर्डर क्रमांक असे तपशील पहिल्या पानावर असतात. खाते पुस्तकावरील इतर पानावर व्यवहारांची माहिती उदा. तारीख, तपशील, रक्कम, धनादेश क्रमांक, [[जमा]] कि नावे आणि व्यवहारानंतर खात्यातील शिल्लक रक्कम असते.
 
खाते पुस्तक हरवले तर बँकेला अर्ज करून नवीन खातेपुस्तक मिळू शकते. या साठी काही शुल्क भरावे लागते. काही वेळा ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी पैसे काढताना खाते पुस्तक बरोबर असणे सक्तीचे केले जाते. गैर व्यक्तीने खात्यातील पैसे काढू नयेत या साठी हे आवश्यक आहे.
 
[[खाते उतारा]] आणि खाते पुस्तक यांचा उद्देश एकाच आहे, ग्राहकाला त्याच्या खात्यातील व्यवहारांची माहिती होणे. खातेपुस्तक ग्राहक कधीही भरून घेऊ शकतो व त्यामुळे व्यवहारांची माहिती क्षणात होऊ शकते. खाते उतारा हा ठराविक कालावधी नन्तर दिला जातो.
 
[[वर्ग:बँकिंग]]