२९,७८९
संपादने
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो (→बाह्य दुवे: वर्ग) |
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) (+{{मृत दुवा}}...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.) |
||
'''हेड्रियान''' (लॅटिन:''पब्लियस ट्रैनियस हेड्रियानस ऑगस्टस'';PVBLIVS AELIVS TRAIANVS HADRIANVS AVGVSTVS) ([[जानेवारी २४]], [[इ.स. ७६]]:[[इटालिका]], [[स्पेन]] किंवा [[रोम]], [[इटली]] - [[जुलै १०]], [[इ.स. १३८]]) हा [[इ.स. ११७]] ते मृत्यूपर्यंत [[रोमन सम्राट]] होता. [[नर्व्हा-अँटोनियन वंश|नर्व्हा-अँटोनियन वंशाच्या]] पाचांपैकी हा तिसरा सम्राट होता. आपल्या २३ वर्षांच्या सद्दीत याने रोममधील [[पँथियॉन]] परत बांधवले तसेच [[व्हिनस आणि रोमाचे देउळ]]ही बांधवले. हेड्रियानला मानवतावादी रोमन सम्राट मानले जाते.
हेड्रियानचा जन्म इटालियन वंशाच्या स्पॅनिश कुटुंबात [[सेव्हिया]]जवळील इटालिका या गावात झाला. हेड्रियानच्या काही चरित्रांमध्ये त्याचा जन्म रोममध्ये झाल्याचाही उल्लेख आहे. हा रोमन सम्राट [[ट्राजान]]च्या आतेभावाचा मुलगा होता.<ref>[http://www.forumromanum.org/literature/eutropius/text8.html Eutr. VIII. 6]: "...nam eum (Hadrianum) Traianus, quamquam consobrinae suae filium..." and [http://penelope.uchicago.edu/Thayer/L/Roman/Texts/Historia_Augusta/Hadrian/1*.html SHA, ''Vita Hadr''. I, 2]: ''...pater Aelius Hadrianus cognomento Afer fuit, consobrinus Traiani imperatoris.''</ref> ट्राजानने जरी आपला वारस जाहीर केला नसला तरी त्याची पत्नी [[पाँपैया प्लॉटिना]] हीने सांगितले की ट्राजान मृत्युशैय्येवर असताना त्याने हेड्रियानला आपला वारस घोषित केले होते. प्लॉटिना आणि ट्राजानचा मित्र [[लुसियस लिसिनस सुरा]] यांच्या सहाय्याने हेड्रियान रोमन सम्राटपदी आला.<ref>After A. M. Canto, in [http://www.ucm.es/BUCM/revistas/ghi/02130181/articulos/GERI0303120305A.PDF UCM.es]{{मृत दुवा}}, specifically pp. 322, 328, 341 and footnote 124, where she stands out SHA, ''Vita Hadr.'' 1.2: ''pro filio habitus'' (years 93); 3.2: ''ad bellum Dacicum Traianum familiarius prosecutus est'' (year 101) or, principally, 3.7: ''quare adamante gemma quam Traianus a Nerva acceperat donatus ad spem successionis erectus est'' (year 107).</ref>
आपल्या सत्ताकालादरम्यान हेड्रियान आपल्या साम्राज्याच्या प्रत्येक प्रांतात स्वतः गेला. ग्रीक विचारसरणीने प्रभावित झालेल्या हेड्रियानने [[अथेन्स]]ला आपल्या साम्राज्याची सांस्कृतिक राजधानी करण्यासाठी प्रयत्न केले व तेथे अनेक भव्य देउळेही बांधली. स्वतः सैनिकी पेशात असल्याने हेड्रियान सहसा सैनिकी वेशातच असे व प्रासादांमध्ये न राहता आपल्या सैन्याबरोबरच राहत असे. आपले सैन्य अधिक प्रबळ व्हावे यासाठी त्याने कवायती नेमून दिल्या. सैन्य कायम सतर्क रहावे म्हणून क्वचित तो स्वतःच शत्रू जवळपास आल्याच्या वावड्याही मुद्दामच उडवत असे.
|
संपादने