"ख्रिस्तोफर कोलंबस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहिता वापरली
+{{मृत दुवा}}...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
ओळ ४३:
तुर्कांनी काॅनस्टॅन्टिनोपल जिंकल्याने युरोपीयांचे [[आशिया]] खंडाशी [[व्यापार]] करण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे व्यापार करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याची आवश्यकता होती. यासाठी कोलंबस सागरी मार्गाने निघाला खरा पण तो भारतात न पोहचता उत्तर अमेरिकेत पोहचला. पण आपण भारतातच पोहोचलो आहे अशी त्याची समजूत झाली. मात्र काही वर्षांनी [[अमेरिगो व्हेस्पुसी]] हा कोलंबसच्या मार्गावर निघाला व अमेरिका खंडात पोहचला. पण त्याला लक्षात आले की हा भारत नसून दुसरीच भूमी आहे कारण भारतातील लोक [[शेती]] करतात हे त्याला माहित होते. त्यामुळे त्याच्या नावावरून या खंडाला '''अमेरिका''' असे नाव दिले गेले.
 
कोलंबस हा अमेरिकेला पोहोचणारा पहिला युरोपीय शोधक नव्हता. लिफ एरिकसनने ११व्या शतकात नोर्स मोहिमेखाली अमेरिका गाठली होती.<ref>http://www.pc.gc.ca/lhn-nhs/nl/meadows/index_e.asp {{मृत दुवा}}</ref> पण त्याचा पाठपुरावा झाला नाही आणि त्यामुळे त्यातून टिकाऊ असा युरोप व अमेरिका संबंध अस्तित्वात आला नाही, तो कोलंबसच्या सफरींमुळे होण्यास सुरुवात झाली. पुढची काही शतके युरोपचा हा अमेरिका-शोध, कब्जा व वसाहतीकरण चालूच राहिले. त्याचा आधुनिक जगाच्या घडणीवरही बराच प्रभाव पडला. कोलंबसने ख्रिस्ती धर्माचा प्रसार ही स्वतःची मोठी कर्तबगारी मानली.<ref name="Britanica"/>
 
आपण पूर्व दिशेला असलेल्या हिंदुस्थानात न पोचता युरोपीयांना अपरिचित असलेल्या खंडात पोचलो हे कोलंबसने कधी कबूल केले नाही. उलट जिथे तो पोचला त्या रहिवाशांना त्याने इंडियोस (स्पॅनिश भाषेत हिंदुस्थानी) असे संबोधले.<ref>http://books.google.co.uk/books?id=o-BNU7QuJkYC&pg=PA568&dq=columbus+indios+indians+India&hl=en&ei=i0zLS4mwFNijOJrTkaIG&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=2&ved=0CD8Q6AEwAQ#v=onepage&q=columbus%20indios%20indians%20India&f=false {{मृत दुवा}}</ref> पुढे कोलंबसचे स्पेनचा राजा व त्याने नेमलेला अमेरिकी वसाहतीवरचा प्रशसक यांच्याशी संबंध बिघडले व त्याची परिणती इ.स. १५०० मध्ये कोलंबसच्या अटकेत व हिस्पनोलिआ बेटाच्या राज्यपालपदावरून हकालपट्टी होण्यात झाली. त्यावर कोलंबस व त्याचे वारसदार ह्यांनी आपल्याला राज्याकडून अपेक्षित हक्काचा लाभ मिळावा ह्यासाठी बरीच वर्षे कायदेशीर लढाई दिली.