"अजित सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Cleaned up using AutoEd
ओळ १:
'''अजित सोमण''' ([[६ ऑगस्ट]], [[इ.स. १९४७|१९४७]] - [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. २००९|२००९]]) हे प्रसिद्ध बासरीवादक ,संगीततज्ञ, संहितालेखक, जाहीरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक होते. त्यांनी संगीत, जाहिरात, संहितालेखन आणि अध्यापन अशा विविध क्षेत्रांत काम केले. [[मराठी]],[[हिंदी]],[[इंग्रजी]],[[संस्कृत]] या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
 
==संगीतातील कारकीर्द ==
त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केले. [[सुधीर फडके]], [[यशवंत देव]], [[हृदयनाथ मंगेशकर|पं.हृदयनाथ मंगेशकर]],[[श्रीधर फडके]],[[आनंद मोडक]],[[पं. बिरजू महाराज]], [[ पं. कालिचरण महोपात्र]],पंडिता [[रोहिणी भाटे]],[[प्रभा मराठे]],[[सुचेता चापेकर]],[[मनिषा साठे]],[[पार्वती दत्ता]],[[रोशन दात्ये]] यांच्याबरोबर विविध कार्यक्रमांमध्ये बासरीची साथ केली.
सखी मंद झाल्या तारका, ही वाट दूर जाते यासारख्या अनेक प्रसिद्ध गाण्यांमध्ये किंवा इंडो जॅझ ग्रुपच्या अँटीग्रॅव्हीटी, बुगी फॉर हनुमान अशा सीडीज् मध्ये सोमणांची बासरी ऐकायला मिळते. त्यांनी अनेक लघुपटांसाठी पार्श्वसंगीत दिले आहे. युजीसीच्या अंतर्गत तयार केलेल्या "राग रंजन" या मालिकेच्या आखणीपासून ते संहितालेखनापर्यंत सर्व काम सोमणांनी केले होते. याच मालिकेला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. सोमणांच्या चाहत्यांत [[बिरजू महाराज]], [[प्रभा मराठे]], [[रोहिणी भाटे]] [[पार्वती दत्ता]] तसेच संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश आहे.
 
स्वरानंद, सुगम, आशा पब्लिसिटी अशा नामवंत संस्थांचे त्यांनी विश्वस्त,अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
 
सोमण यांच्यावर एक लघुपट तयार करण्यात आला आहे.[[अजित सातभाई]] यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.
ओळ १४:
पुणे विद्यापीठातील [[ललित कला केंद्र|ललित कला केंद्रात]] त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अप्लाईड म्युझिक, म्युझिक अॅप्रीसिएशन हे विषय शिकवले.या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरल्या जाणाऱ्या 'संगीत' या पुस्तकाचे ते सहलेखक आहेत.
 
==कॉपी रायटिंग मधील कारकीर्द ==
सोमण यांनी लिहिलेल्या अनेक जिंगल्स व जाहिराती प्रसिद्ध झाल्या. "ऊंचे लोग ऊंची पसंद", "चवीनं खाणार त्याला केप्र देणार", " या वर्षी पु.लंची दिवाळी तुमच्याघरी ", "सकाळ घरात आला की, आजोबांपासून नातवापर्यंत सासूपासून सुनेपर्यंत सगळ्यांचा स्वार्थ एकदम जागा होतो" , " प्रत्येक कुटुंबासाठी-कुटुंबातील प्रत्येकासाठी सकाळ" या काही त्यांच्या गाजलेल्या जाहिराती आहेत.
 
==संहिता आणि गीतलेखन==
अनेक औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांगीतिक लघुपटांसाठी तसेच अनेक द्रुकश्राव्य कार्यक्रमांसाठी सोमण यांनी संहिता लिहिल्या आहेत.
अनेक जिंगल्स तसेच 'राऊ' सारख्या मालिकेसाठी आणि 'देवी अहिल्याबाई' या चित्रपटासाठी गीतलेखन केले तसेच 'एक होता विदुषक' मधील तराणा सोमण यांनी लिहिला आहे.
 
'टोकन नंबर', 'या आमुच्या हसर्या घरात' सारख्या मालिकांचे शीर्षकगीत सोमण यांनी लिहिले आहे.
ओळ २५:
NDA चे स्फूर्ती गीत सोमण यांनी लिहिले आहे.
 
'लाखाची गोष्ट', 'गुळाचा गणपती', 'गाभारा' या गाजलेल्या चित्रपटांचे इंग्रजी subtitling सोमण यांचे आहे.
 
सोमण यांनी कथक नृत्यासाठी अनेक बॅले, ठुमऱ्या लिहिल्या आहेत.
ओळ ३५:
अजित सोमण यांच्या स्मृत्यर्थ विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सॊमण परिवारातर्फे दरवर्षी '''स्वरशब्दप्रभू पुरस्काराने''' सन्मान करण्यात येत असतो. तसेच उदयोन्मुख कलाकाराला त्यांच्या नावाची शिष्यवृत्तीही देण्यात येते.
आजवर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती:
 
* २०१७ : [[सुधीर गाडगीळ]]
* २०१६ : [[अरुण काकतकर]]
* २०१५ : [[मनीषा साठे]]
* २०१४ : [[ रमाकांत परांजपे ]]
* २०१३ : [[सुधीर मोघे]]
* २०१२ : [[श्रीधर फडके]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अजित_सोमण" पासून हुडकले