"अजित सोमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केले. [[सुधीर फडके]], [[यशवंत देव]], [[हृदयनाथ मंगेशकर|पं.हृदयनाथ मंगेशकर]],[[श्रीधर फडके]],[[आनंद मोडक]],[[पं. बिरजू महाराज]], [[ पं. कालिचरण महोपात्र]],पंडिता [[रोहिणी भाटे]],[[प्रभा मराठे]],[[सुचेता चापेकर]],[[मनिषा साठे]],[[पार्वती दत्ता]],[[रोशन दात्ये]] यांच्याबरोबर विविध कार्यक्रमांमध्ये बासरीची साथ केली.
सखी मंद झाल्या तारका, ही वाट दूर जाते यासारख्या अनेक प्रसिद्ध गाण्यांमध्ये किंवा इंडो जॅझ ग्रुपच्या अँटीग्रॅव्हीटी, बुगी फॉर हनुमान अशा सीडीज् मध्ये सोमणांची बासरी ऐकायला मिळते. त्यांनी अनेक लघुपटांसाठी पार्श्वसंगीत सुद्धा दिले आहे. युजीसीच्या अंतर्गत तयार केलेल्या "राग रंजन" या मालिकेच्या आखणीपासून ते संहितालेखनापर्यंत सर्व काम सोमणांनी केले होते. याच मालिकेला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. सोमणांच्या चाहत्यांत [[बिरजू महाराज]], [[प्रभा मराठे]], [[रोहिणी भाटे]] [[पार्वती दत्ता]] तसेच संगीत क्षेत्रातील नामवंतांचा समावेश आहे.
 
स्वरानंद, सुगम, आशा पब्लिसिटी अशा नामवंत संस्थांचे त्यांनी विश्वस्त,अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
 
सोमण यांच्यावर एक लघुपट तयार करण्यात आला आहे.[[अजित सातभाई]] यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.
 
==शिक्षण क्षेत्रातील कारकीर्द==
पुणे विद्यापीठातील [[ललित कला केंद्र|ललित कला केंद्रात]] त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अप्लाईड म्युझिक, म्युझिक अॅप्रीसिएशन हे विषय शिकवले.या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरल्या जाणाऱ्या 'संगीत' या पुस्तकाचे ते सहलेखक आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/अजित_सोमण" पासून हुडकले