"भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८:
 
१) ही कालगणना कशासाठी?<br/>
भारताचे पहिले पंतप्रधान . जवाहरलाल [[ जवाहरलाल नेहरू|नेहरू]] यांच्या पुढाकाराने तत्कालीन मान्यवर शास्त्रज्ञ डॉ. [[मेघनाद साहा|मेघनाद]] साहा यांच्या अध्यक्षतेखालील कालगणनापुनर्रचना समितीने इ. स. १९५६पासून सौर कालगणना बनवून इ. स. १९५७पासून प्रसारात आणली. आकाशवाणी, दूरदर्शन, शासकीय पत्रव्यवहार इ. ठिकाणी या कालगणनेनुसार तारखेचा उल्लेख केला जातो. पुण्यातील [[ज्ञानप्रबोधिनी]],मराठी विज्ञान परिषद आणि अन्य काही संस्थांद्वारा गेली काही वर्षे ही राष्ट्रीय सौर दिनदर्शिका प्रकाशित केली जात आहे . सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील परस्पर-संबंधावर आधारित असणारी ही सौर कालगणना, चांद्र कालगणनेपेक्षा ऋतु-चक्राला अधिक जवळची आहे. चांद्रमासाचा कालावधी सुमारे २९.५३ दिवसांचा आहे. त्याला १२ महिन्यांनी गुणल्यास वर्षाचे सुमारे ३५४ दिवस होतात व ३६५ दिवसांच्या सौर वर्षापेक्षा चांद्रवर्ष हे सुमारे १०-११ दिवसांनी कमी पडते. चांद्र आणि सौर कालगणनेतील हा १०-११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी भारतीय पंचांगकर्त्यांनी अधिक मास आणि क्षयमास यांची योजना केली. त्यामुळे भारतीय पंचांगात महिने हे चांद्र कालगणनेनुसार पण एकूण वर्ष हे मात्र सौर कालगणनेनुसार असे असते. म्हणजे भारतीय पंचांगात चांद्र कालगणनासुद्धा सौर कालगणनेशी स्वतःला जुळवून घेते. <br/>
चांद्रवर्षातील अधिक मास आणि क्षयमास याचा संबंध सूर्याच्या राशिसंक्रमणाशी आहे. सूर्याचे राशिसंक्रमण आणि चांद्रमास बदल एकाच समान दिवशी होत नाही. त्यामुळे सौर आणि चांद्र कालगणना एकमेकांशी जुळवून घेताना या युक्त्या कराव्या लागतात. एखाद्या चांद्रमासात सूर्याचे राशिसंक्रमण झालेच नाही तर त्या महिन्याला अधिकमास आणि दोन वेळा झाले तर क्षयमास असे म्हणतात.<br/>
भारतीय पंचांगात अधिकमास, क्षयमास, तिथिक्षय, तिथिवृद्धी इ. संकल्पना वापरून चांद्र- सूर्य कालगणनांची जुळणी केली नसती तर केंव्हातरी होळीचा सण पावसाळ्यात साजरा करण्याची पाळी आली असती.<br/>