"खरवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २:
 
अशा दुधामध्ये थोडे साधे दूध मिसळून ते [[उकडणे |उकळले]] जाते, उकळल्यानंतर पाणी कमी झाल्यावर प्रथिने घट्ट होतात व दुधाचा खरवस तयार होतो. जवळजवळ असाच भासणारा खरवस चायना ग्रास वापरून बनवता येतो.
 
==खरवस बनवण्याची पद्धत==
 
'''साहित्य:'''
 
१ लिटर पहिल्या दिवसाचा दुधाचा चिक
१ लिटर दुध
दोनशे ते अडीचशे ग्राम साखर (साधारण १ पाणी प्यायचे फुलपात्र)
२-३ चिमटी केशर
१/२ टीस्पून वेलचीपूड
मोठा कुकर
२ कुकरच्या आतील डबे
 
 
'''कृती:'''
 
१) केशर अगदी थोडे कोमट करून पाव वाटी दुधात भिजत घालून ठेवावे.
 
२) चिक आणि दुध एकत्र करून त्यात साखर घालावी. साखर विरघळेस्तोवर ढवळावे. चव पाहून लागल्यास अजून साखर घालावी.
 
३) केशर आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.
 
४) तयार मिश्रण कुकरमध्ये भात शिजवतो तसेच शिजवून घ्यावे.कुकरचे २ मोठे डबे घ्यावे. डब्यात तयार मिश्रण सारखे विभागून घालावे. कुकरच्या तळाशी दीड इंचभर पाणी घालावे. एक डबा अलगदपणे पकडीच्या मदतीने आत ठेवावा. त्यावर ताटली ठेवावी. त्याच्या डोक्यावर अजून एक डबा ठेवावा. वर अजून एक ताटली ठेवावी. झाकण लावून २ शिट्ट्या कराव्यात. आच बारीक करून मिनिटभराने बंद करावी.
५-८ मिनिटांनी कुकरचे प्रेशर गेल्यावर झाकण काढून दोन्ही डबे बाहेर काढावेत. गार होईस्तोवर हवेवर उघडेच ठेवावे.
कोमटसर झाले की खाल्ले तरी चालते. पण फ्रीजमध्ये गार करून खाल्ल्यास अजून स्वादिष्ट लागतात.
खरवस फ्रीजमध्ये ८ दिवस सहज टिकतो.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:खाद्यपदार्थ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खरवस" पासून हुडकले