"फ्रान्सचे रशियावरील आक्रमण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
एका आठवड्यानंतर नेपोलियनने [[मॉस्को]]मध्ये प्रवेश केला. परंतु सम्राटाशी भेट घेण्यास शहरातून कोणतेच शिष्टमंडळ न आल्याने फ्रेंच चक्रावून गेले. रशियनांनी अगोदरच शहर रिकामे केले होते व नगरप्रमुख काउन्ट फ्यॉडॉर रोस्तोपचिन याने मॉस्कोतील अनेक मोक्याच्या ठिकाणी आग लावण्याचे आदेश दिले होते. नेपोलियनची आशा त्याची मोहीम मोठ्या विजयामुळे पूर्ण होईल अशी होती, परंतु रणांगणावरील विजयामुळे तो युद्धात विजयी होऊ शकला नाही. मॉस्कोच्या पाडावामुळे अलेक्झांडरला तह करणे भाग पडले नाही व फ्रेंचांची स्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याचे दोन्ही बाजू जाणून होत्या. रशियन सैन्यातील कथित असंतोष व खचणार्‍या मनोधैर्याच्या खोट्या वार्ता पसरवल्यामुळे नेपोलियन तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी मॉस्कोमध्येच थांबला. तिथे एक महिनाभर वास्तव्य केल्यावर नेपोलियनने त्याचे सैन्य नैर्ऋत्येकडे जेथे कुटुझोवच्या सैन्याचा तळ होता अशा [[कालुगा]]च्या दिशेने वळवले, .
 
फ्रेंचांच्या कालुगावरील आक्रमणास एका रशियन तुकडीने त्रास दिला. नेपोलियनने पुन्हा एकदा रशियन सैन्याशी निर्णायक लढाईसाठी [[मालोयारोस्लावेत्सचीमालोयारोस्लावेत्झची लढाई|मालोयारोस्लावेत्समालोयारोस्लावेत्झ]] सामना केला. अधिक चांगल्या स्थितीत असूनही रशियन सैन्याने एका मोठ्या चकमकीनंतर माघार घेतली. थकलेली सैन्ये, संपत चालली रसद, हिवाळी कपड्यांचा अभाव व उर्वरित घोडे वाईट स्थितीत अशा परिस्थितीत नेपोलियनला माघार घेणे भाग पडले. [[स्मोलेन्स्क]] व नंतर [[व्हिल्नियस]] येथील रसद मिळवण्याची त्याची अपेक्षा होती. यानंतरच्या आठवड्यांमध्ये रशियन हिवाळ्याला आरंभ झाल्याने ग्रान्द आर्मीचे प्रचंड हाल झाले. घोड्यांसाठीच्या चार्‍याचा अभाव, कडाक्याच्या थंडीमुळे हायपोथर्मिया {{मराठी शब्द सुचवा}} व एकाकी पडलेल्या सैन्य तुकड्यांवर कोसॅक व रशियन शेतकर्‍यांकडून होणारे हल्ले या सर्व कारणांमुळे अनेक सैनिक मृत्युमुखी पडले व सैन्यातील एकजूट संपुष्टात आली. नेपोलियनच्या उर्वरित सैन्याने जेव्हा [[बेरेझिना नदी]] [[बेरेझिनाची लढाई|पार]] केली तेव्हा जेमतेम २७,००० सैनिक शिल्लक शिल्लक होते. ग्रान्द आर्मीचे ३,८०,००० सैनिक ठार व १,००,००० युद्धकैदी झाले. या लढाईनंतर आपल्या सल्लागारांच्या आग्रहावरून व मार्शल्सच्या (सेनापतींच्या) एकमताने दिलेल्या मान्यतेमुळे नेपोलियन सैन्य सोडून परतला. तो आपले सम्राटपद कायम ठेवण्यासाठी व आगेकूच करणार्‍या रशियनांना विरोध करण्यास अधिक सैन्य गोळा करण्यासाठी पॅरिसमध्ये परतला. अंदाजे सहा महिने चाललेली ही मोहीम १४ डिसेंबर १८१२ रोजी खर‍या अर्थाने संपुष्टात आली आणि रशियाच्या भूमीवरून अखेरच्या फ्रेंच दळांनी माघार घेतली.
 
हे युद्ध [[नेपोलियोनिक युद्धे|नेपोलियोनिक युद्धांतील]] निर्णायक टप्पा होता. नेपोलियनच्या कीर्तीला यामुळे फार मोठा तडा गेला व युरोपवरील फ्रेंच प्रभुत्व खिळखिळे झाले. फ्रान्स व त्याच्या मांडलिक राष्ट्रांची मिळून तयार झालेल्या ग्रान्द आर्मीचा विनाश झाला. या घटनांमुळे युरोपीय राजकारणात महत्त्वाचे बदल घडले. फ्रान्सची मित्रराष्ट्रे [[प्रशिया]] व नंतर [[ऑस्ट्रियन साम्राज्य|ऑस्ट्रिया]] यांनी त्यांच्यावर लादलेले मित्रत्वाचे तह मोडून पक्षबदल केला व त्यामुळे [[सहाव्या संघाचे युद्ध|सहाव्या संघाच्या युद्धास]] प्रारंभ झाला.
१०,५३२

संपादने