"व्हाल्टेअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदेश हिवाळे ने लेख व्होल्तेर वरुन व्हाल्टेअर ला हलविला
+img
ओळ १:
[[File:Voltaire - Elémens de la philosophie de Neuton, 1738 - 4270772.tif|thumb|''Elémens de la philosophie de Neuton'', 1738]]
'''फ्रांस्वा-मरी अरूएत''' तथा '''व्हाल्टेअर''' ([[नोव्हेंबर २१]], [[इ.स. १६९४]] - [[मे ३०]], [[इ.स. १७७८]]) हा एक [[फ्रेंच]] [[लेखक]], [[कवी]] व [[तत्त्वज्ञ]] होता. व्हॅाल्टेअरने [[नवलकथा]], [[निबंध]], [[नाटक]]े, [[कविता]], ऐतिहासिक, शास्त्रीय असे चौफेर लेखन केले व त्यातून त्याने [[फ्रान्स]]मधील अनियंत्रीत [[राजेशाही]], स्वार्थी [[धर्म]][[गुरू]] व विलासी उमराव यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. 'कॅन्डिड' हा त्याचा विशेष प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्याने एकूण २,००० [[पुस्तक]]े तसेच २,००० पेक्षा अधिक पत्रे लिहिली. त्याचे ललित लेखन उपरोधिक असे. लोकांच्या मनातील सुप्त भावनांना शब्दरूप करण्याचे महत्त्वाचे कार्य व्हॅाल्टेअरने केले. [[फ्रांस]]मधील विषम समाजव्यवस्थेवर त्याने कडक टिका केली. तो [[लोकशाही]]चा पुरस्कर्ता नव्हता. व्यक्तिस्वातंत्र्याचा व राजेशाहीचा पुरस्कर्ता होता. '''शंभर उंदरापेक्षा एका सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय.''' असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्याला दोनदा तुरूंगात टाकण्यात आले. तसेच फ्रांसमधून हद्दपार सुद्धा करण्यात आले. त्याच्या विचारामुळे लोकजागृती होऊन, लोक जुलूम व अन्यायाच्या विरूद्ध बंड करण्यास प्रवृत्त झाले.