"प्रकाशाचा वेग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२:
विशेष सापेक्षतेच्या सिद्धान्ताचा सारांश हा अवकाश व काळ यांना [[काल-अवकाश]] अशी एक एकसंध रचना मानून भौतिकीय सिद्धान्तांना लॉरेन्ट्झ अचलता या विशेष सममितीची अट पूर्ण करण्यास भाग पाडणे असा सांगता येतो. लॉरेन्ट्झ अचलता हे पुंज विद्युत्गतिकी, पुंज कालगतिकी, कणभौतिकीची [[प्रमाण प्रतिकृती]] व [[साधारण सापेक्षता]] अशा आधुनिक भौतिकशास्त्रीय सिद्धान्तांसाठीचे एक जवळपास वैश्विक गृहीतक आहे. त्यामुळे ''c'' हा स्थिरांक आधुनिक भौतिकशास्त्रात सर्वव्यापी आहे व तो प्रकाशाशी काही संबंध नसलेल्या क्षेत्रांतही आढळतो. उदाहरणार्थ गुरूत्वाकर्षणाचा व गुरूत्वीय लहरींचा वेग हा ''c'' असल्याचे साधारण सापेक्षता वर्तवते.
 
सामान्यपणे असे गृहीत धरले जाते की प्रकाशाची गती व अन्य वैश्विक स्थिरांक मूल्य सर्व काल-अवकाशात समानच असतात, म्हणजे स्थानानुसार किंवा वेळेनुसार त्यांच्या मूल्यांत काहीही बदल होत नाही. परंतु अनेक नवीन सिद्धांतांमध्ये प्रकाशाचा वेग काळानुसार बदलला असल्याचे मांडले गेले आहे. याबाबत अजूनपर्यंत काहीही निर्णायक पुरावे निरीक्षणातून आढळले नाहीत, पण हा चालू संशोधनाचा महत्त्वाचा विषय उरला आहे.
 
==इतिहास==