"प्रकाशाचा वेग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४९० बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
 
विशेष सापेक्षतेच्या सिद्धान्ताचा सारांश हा अवकाश व काळ यांना [[काल-अवकाश]] अशी एक एकसंध रचना मानून भौतिकीय सिद्धान्तांना लॉरेन्ट्झ अचलता या विशेष सममितीची अट पूर्ण करण्यास भाग पाडणे असा सांगता येतो. लॉरेन्ट्झ अचलता हे पुंज विद्युत्गतिकी, पुंज कालगतिकी, कणभौतिकीची [[प्रमाण प्रतिकृती]] व [[साधारण सापेक्षता]] अशा आधुनिक भौतिकशास्त्रीय सिद्धान्तांसाठीचे एक जवळपास वैश्विक गृहीतक आहे. त्यामुळे ''c'' हा स्थिरांक आधुनिक भौतिकशास्त्रात सर्वव्यापी आहे व तो प्रकाशाशी काही संबंध नसलेल्या क्षेत्रांतही आढळतो. उदाहरणार्थ गुरूत्वाकर्षणाचा व गुरूत्वीय लहरींचा वेग हा ''c'' असल्याचे साधारण सापेक्षता वर्तवते.
 
सामान्यपणे असे गृहीत धरले जाते की प्रकाशाची गती व अन्य वैश्विक स्थिरांक मूल्य सर्व काल-अवकाशात समानच असतात, म्हणजे स्थानानुसार किंवा वेळेनुसार त्यांच्या मूल्यांत काहीही बदल होत नाही.
 
==इतिहास==
१०,५३२

संपादने