"भास्कर चंदनशिव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
प्रा.'''भास्कर चंदनशिव''' हे [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक आहेत.
निजाम राजवटीत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात हासेगांव या खेडयात ग्रामीण साहित्याला नवे आयाम देणाऱ्या चंदनशिव यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण खेडेगावात झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबाजोगाई आणि औरंगाबाद असा प्रवास त्यांनी केला. वयाच्या विसाव्या वर्षी भास्कर चंदनशिव यांनी कथालेखनास प्रारंभ केला. तत्पूर्वी मराठवाडयाच्या काळजावर सातत्याने कोरला गेलेला दुष्काळ हा त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला.
१९६२ ते ७२ या कालावधीत दुष्काळाचा अभ्यास आणि अनुभव यांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी काम केले. त्यातूनच पुढे निर्माण झालेल्या साहित्यकृतीमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक नायकाच्या रूपाने वाचकांच्या समोर येतो. ज्यांची नाळ मातीशी जोडली गेलेली आहे आणि मूळ गावगाडयात घट्ट रुतलेले आहे. चंदनशिव यांच्या ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘बिरडं’, ‘नवी वारूळं’ या कथासंग्रहांचा आवर्जून उल्लेख केला जातो. मानवी समाजजीवनाला व्यापकपणे स्पर्श करणाऱ्या या कथासंग्रहाने शेती क्षेत्रात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उगवून आलेले वेदनेचे कोंब दाखवून देण्याचे काम केले.
 
[[वर्ग:साहित्यिक]]