"आमिर खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२:
१९७३ साली आलेल्या [[यादों की बारात]] ह्या चित्रपटामध्ये आमिरने बाल कलकार म्हणून काम केले होते. त्यानंतर १९८४ सालच्या ''होली'' ह्या चित्रपटामध्ये देखील त्याची भूमिका होती. [[कयामत से कयामत तक]] ह्या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून आमिरने [[जुही चावला]]सोबत नायकाच्या रूपाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या तूफान यशानंतर आमिरने अनेक दर्जेदार भूमिका करून बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये आपले नाव जोडले. अभिनयासोबतच आमिरने चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती देखील केली आहे. २०१२ सालच्या [[सत्यमेव जयते (दूरचित्रवाणी मालिका)|सत्यमेव जयते]] ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान ह्या नात्याने त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
 
आजवर आमिरला अनेक [[फिल्मफेअर पुरस्कार|फिल्मफेअरसह]] अनेक [[पुरस्कार]] मिळाले असून त्याच्या कला क्षेत्रामधील योगदानासाठी [[भारत सरकार]]ने त्याला २००३ साली [[पद्मश्री]] तर २०१० साली [[पद्मभूषण]] पुरस्कार देऊन गौरवले. २०११ साली आमिरला [[युनिसेफ]]ने जगातील शिशू आहार सुधारण्याच्या अभियानामध्ये राष्ट्रीय राजदूत ह्या स्वरूपात नियुक्त केले. चित्रपटसृष्टीसोबत आमिरने इतर सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये योगदान दिले आहे. २००६ साली त्याने [[मेधा पाटकर]] चालवित असलेल्या [[नर्मदा बचाओ आंदोलन]]ाला पाठिंबा जाहीर केला होता. आमिर खान हा [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना आपले प्रमुख प्रेरणास्थान मानतो.
 
[[चित्र:Secretary_Clinton_and_Bollywood_Star_Aamir_Khan.jpg|इवलेसे|आमिर खान व [[अमेरिका|अमेरिकेच्या]] परराष्ट्र सचिव [[हिलरी क्लिंटन]]]]
 
==चित्रपटयादी==
{| class="wikitable sortable"
"https://mr.wikipedia.org/wiki/आमिर_खान" पासून हुडकले