"भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
लेखात भर घातली
ओळ २२:
२.२) भारतीय सौर कालगणनेतील प्रत्येक महिना सुद्धा सूर्याच्या राशिसंक्रमणाशी जुळणारा आहे. सूर्याचा प्रत्येक राशीतील कालावधी पाहून त्यानुसार या सौर कालगणनेत महिन्याचे 30 अथवा 31 दिवस निश्चित केले आहेत. त्यानुसार रास आणि सौर मास हे पुढील प्रमाणे जुळतात. मेष-चैत्र, वृषभ- वैशाख, मिथुन-ज्येष्ठ, कर्क-आषाढ,सिंह- श्रावण, कन्या-भाद्रपद, तूळ- आश्वि न, वृश्चिेक-कार्तिक, धनु-अग्रहायण, मकर- पौष, कुंभ-माघ, मीन-फाल्गुन.<br>
सूर्याचा मकरराशीत प्रवेश म्हणजेच मकरसंक्रांत अथवा उत्तरायणाचा प्रारंभ ग्रेगोरियन कालगणनेनुसार 22 डिसेंबर रोजी होतो. <br>
धार्मिक कार्यासाठी निरयन चांद्रमासयुक्त गणना वापरावी असे समितीने सुचवले आहे कारण धार्मिक विधींमध्ये नक्षत्रांना महत्त्व आहे आणि ती ती नक्षत्रे त्या त्या वेळी प्रत्यक्ष असण्याच्या दृष्टीने निरयन पंचांग उपयुक्त असते.वर्ष मात्र आयनिक किंवा सांपातिक घ्यावे. . आयनिक वर्षापेक्षा नाक्षत्र सौर वर्ष सुमारे 21 मिनिटांनी जास्त मोठे आहे. नाक्षत्र वर्ष = एखादी तारका आकाशमध्यावर आल्यावर दुसऱ्या वर्षी पुनः तेथेच येण्याचा काळ. नाक्षत्र वर्ष थोडे मोठे असल्यामुळे आणि राशी या नक्षत्राशी संबद्ध असल्यामुळे सूर्याचे राशिसंक्रमण दरवर्षी थोडे थोडे उशिरा होते. मकरसंक्रांत पूर्वी 22 डिसेंबर ला येत होती ती आता 14 जानेवारीला येते. कालांतराने ती आणखी पुढे पुढे जात राहील. दर 157 वर्षांनी एक दिवस पुढे अशा रीतीने 1974 पासून ती 14 जानेवारी ला येत आहे. पुढे काही वर्षांनी संक्रात उन्हाळ्यात येऊ लागून विचित्र परिस्थिती ओढवेल. भारतीय सौर कालगणनेनुसार (सांपातिक सौर कालगणनेनुसार) मकरसंक्रांत दरवर्षी 1 पौषला मानावी. कालमापनातील दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वर्ष आणि महिना .
 
== राष्ट्रीय दिनदर्शिकेचे स्वरूप ==