"नंदू भेंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''नंदू भेंडे''' ([[इ.स. १९५५|१९५५]] - [[११ एप्रिल]], [[इ.स. २०१४|२०१४]]) हे [[रॉक संगीत| रॉक संगीतातील]] गायक होते. मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार आशा भेंडे व रंगकर्मी [[आत्माराम भेंडे]] त्यांचे ते पुत्र होत. त्याचे मामा कवी निस्सीम इझिकेलइझिकील. 'जीझस ख्राईस्ट सुपरस्टार' या [[अदी मर्झबान]] निर्मित नाटकातील 'ज्युडास'च्या भूमिकामुळे व ‘तीन पैशाचा तमाशा’ या मराठी नाटकातील संगीत भूमिकेमुळे ते ख्यातनाम झाले.
 
नंदू भेंडे (मूळ नाव सदानंद) हे मराठीतील पहिले रॉकस्टार होते. सन १९७०च्या दशकात मराठी संगीतप्रेमींना नाट्यसंगीताने, भावसंगीताने वेड लावले होते. त्या काळात नंदू भेडे यांनी रॉक म्युझिक मराठीत आणले. जोश, जल्लोषाने भरलेले हे संगीत तरुणांना आवडले. 'तीन पैशाचा तमाशा' या नाटकातील अंकुशच्या भूमिकेतून नंदू भेडेंनी रसिकांवर आपली छाप पाडली होती. पु. ल. देशपांडे यांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती.