"वृत्तपत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
इ.स. १९७५पूर्वी १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) व दिवाळी या दिवशीही भारतातील वृत्तपत्रे बंद नसत. कारण सगळी वृत्तपत्रे एकदम सुट्टी घेत नसत. त्यामुळे विक्रेत्याला मात्र कधीच सुट्टी मिळत नसे. १५ ऑगस्टला टाइम्स ग्रुपची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत. त्या बदल्यात ते २६ जानेवारीला सुट्टी घेत. तर त्याउलट एक्सप्रेस ग्रुप १५ ऑगस्टला (स्वातंत्र्यदिन) सुट्टी घेत असे व २६ जानेवारीला व दिवाळीला त्यांची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत असत.
 
महाराष्ट्रामधील वृत्तपत्र विक्रेत्याला सुट्टी मिळावी म्हणून दादरमधील एक जुने वृत्तपत्र विक्रेते [[जयराम रघुनाथ सहस्रबुद्धे]] (जन्म : २१ डिसेंबर, इ.स. १९१६) यांनी दादरमधील दोन-चार वृत्तपत्रविक्रेत्यांना बरोबर घेऊन दोन्ही ग्रूप तसेच इतर वृत्तपत्रांच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन काही मार्ग निघतो का? म्हणून चाचपणी केली. परंतु काहीही उपयोग झाला नाही. हा सुट्टीचा प्रश्न सोडवायचा असेल तर विक्रेत्यांनी संघटित झाले पाहिजे, असा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने जयराम रघुनाथ सहस्रबुद्धे त्यांनी हालचालींना सुरुवात केली. वेगवेगळ्या भागांतील विक्रेत्यांना भेटायला व संपर्क साधायला सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्‍नांना यश येऊन त्यांना थेट कुलाब्यापासून कल्याणपर्यंत व इकडे विरारपर्यंत सर्व वृत्तपत्रविक्रेत्यांचा पाठिंबा मिळाला. त्यानंतर मुंबईतील सर्व वृत्तपत्रांनी एकाच दिवशी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला व सुट्टीचे दिवस ठरवून घेतले. अशा प्रकारे सर्व पेपर बंद असतील तेव्हा विक्रेत्यांना सुट्टी मिळू लागली.