"घोडेश्वरीदेवी, घोडेगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छायाचित्र घातले
ओळ ३:
==इतिहास==
घोडेगाव अहमदनगर जिल्ह्यातील नगर-[[औरंगाबाद]] रस्त्यावर एक छोटेसे गाव आहे. साधारणतः १००० वर्षांपूर्वी याचे नाव '''निपाणी वडगाव''' होते. उन्हाळ्याच्या दिवसात या गावातील लोकांना [[पाणी]] टंचाईमुळे पिण्यासाठी पाणी मिळत नसे. त्या काळात गावात पाण्याची खूप बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याच्या शोधासाठी गावातील लोकांना दूर भटकावे लागत असे. साठ सत्तर घरे असलेल्या या गावात पाणी नसल्याने या गावाला निपाणी वडगाव असे नाव पडले. गावातील पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी गावातील सर्व लोक एकत्र आले व सर्वांनी मिळून श्रमदानातून गावात एक [[विहीर]] खणण्याचे ठरवले. खूप कष्टाने १० परस विहीर गावकऱ्यांनी खांदली. परंतू विहिरीला एक थेंब देखील पाणी लागले नाही. गावकरी निराश झाले त्यामुळे गावकऱ्यांना विहिरीचा नाद सोडून दिला. काही दिवसानंतर गावाच्या पूर्वेला असलेल्या [[तुळजाभवानी]] मातेच्या मंदिरातील एका [[साधू]]ने गावाकर्याना त्या मंदीराजवळ विहीर खोदण्याचे सुचवले आणि तेथे नक्की पाणी लागेल असे सांगीतले. गावाच्या [[पूर्व]] दिशेला तुळजाभवानी मातेच्या मंदिरा जवळ विहीर खोदण्याचे काम सुरु झाले. साधारण सहा परस [३६ फुट] खोदकाम झाले तरी पाण्याचा थेब लागेना त्यामुळे या ही विहिरीचे काम व्यर्थ जाते कि काय आसे गावाकार्याना वाटू लागले. काम चालू असतांना एका मंगळवारी सहा परसाच्या पुढे आचानक एक अश्वरूपी [घोड्याच्या आकाराची] दगडाची मूर्ती सापडली. ही मुर्ती कशाची व ती येथे कशी आली हा प्रश्न गावकऱ्यांना पडला. त्या रात्री गावच्या पाटलाच्या स्वप्नात एक [[देवी]] आली व म्हणाली ‘“मी घोडेश्वरी देवी आहे माझी प्राणप्रतिष्ठा तुळजाभवानीच्या मंदिरात करा. यापुढे या गावातील लोकांना पाणी कमी पडणार नाही व गावची कीर्ती सर्वदूर पसरेल ‘ असा दृष्टांत देवून देवी अंतर्धान पावली. दुसऱ्या दिवशी पाटलांनी गावातील लोकांना रात्रीचा दृष्टांत सांगितला व त्या प्रमाणे घोडेश्वरी देवीची प्राणप्रतिष्ठा तुळजाभवानी मंदिरात रेणुका मातेच्या शेजारी केली. त्यानंतर त्या विहिरीचे काम केल्यानंतर विहिरीस भरपूर पाणी लागले. पाणी पिण्यास [[गोड]] होते तसेच या विहिरीच्या पाण्याने अनेक [[त्वचा]][[रोग]] बरे होतात असा अनुभव गावकऱ्यांना येऊ लागला. अश्वरूपी घोडेश्वरी देवीची मूर्ती सापडल्यानंतर देवीच्या कृपेने गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटल्यामुळे या निपाणी वडगावचे नाव घोडेगाव असे पडले. घोडेश्वरी देवीची मुर्ती स्वयंभु असून कुणीही न घडवता आपोआपच तयार झाली आहे. देवीचे मंदिर हेमाडपंथी म्हणजे मोठमोठ्या दगडांनी बनवलेले आहे.
अशा या स्वयंभू घोडेश्वरी देवीचे साक्षात्कार आजच्या या कलीयुगात देखील अनुभवायास मिळतात.[[File:घोडेश्वरी देवी.jpg|thumb|घोदेश्वरी देवी ]]
 
==यात्रा==