"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८७:
नाटकांप्रमणेच चित्रपट, मालिकापण या क्षेत्रातही संगमनेरच्या कलावंतांनी भरीव कामगिरी केली आहे. कधीकाळी संगमनेर जवळच्या निंबाळे येथे वास्तव्य असलेल्या जॉनी वॉकर या विनोदी अभिनेत्याने सिनेसृष्टी गाजवली होती. १९७६ ला संगमनेरच्या युसुफ खान या कलावंताने कुठल्याशा सिनेमात छोटे काम केले होते. पुढे त्यांनी संगमनेरला फोटो स्टुडिओ टाकला. संगमनेरचा कलावंत राजन झांबरे यांनी माहेरची साडी, गौराचा नवरा या सिनेमांत छोट्या भूमिका केल्या आहेत. पुढे मुंबईला सिनेमात जायचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले तरी वेगवेगळ्या मालिका, सिनेमांत ते आजही काम करीत आहेत.
 
संगमनेरची नाट्य चळवळ जोरात चालू असतांनाच संस्थेचे सचिव व कलावंत वसंत बंदावणे यांनी १९८४ साली सिनेमा काढण्याची तयारी सुरुसुरू केली. हा एक धाडसी प्रयोग होता. डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. डॉ. मुटकुळे यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘प्रायश्चित्त’ या सिनेमाचे चित्रीकरण सुरुसुरू झाले. संभाजीराजे थोरात यांच्या बंगल्यात प्रसिद्ध छायाचित्रकार सुनील बूब चित्रीकरण करीत होते. रात्रंदिवस काम चाले. व्यवसायामुळे त्यांना ते जमेना. मग स्वतःचा कॅमेरा घ्यायचा ठरले. त्यासाठी डॉ. सुधीर तांबे, .डॉ .देवेंद्र ओहारा, डॉ. जी.पी.शेख, डॉ .श्रीकांत देशमुख, कांताबाई सातारकर यांनी पैसे दिले व नवा कॅमेरा आणला. पुढे हा सिनेमा पूर्ण झाला पण मार्केटिंग माहीत नसल्याने प्रेक्षकांना पहायला मिळाला नाही. हा संगमनेरातील चित्रपट निर्मितीचा पहिला प्रयत्न असावा.
 
संगमनेरमध्ये बनलेली पहिली दूरचित्रवाणी मालिकेची निर्मितीही बंदावणे यांच्याच नावावर जमा आहे. बंदावणे यांनी २०१२ साली लिनियर फिल्म्स ही निर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत संपूर्ण संगमनेरची, स्वत: लिहिलेली व स्वनिर्मिती ‘बंदिशाळा’ ही मालिका तयार केली.. ती सह्याद्री वाहिनीवरून ५२ भागात प्रसारित झाली. तिला कला संस्कृती दर्पणची तीन नामांकानेही मिळाली होती. या मालिकेत संगमनेरचेया सुर्यकांत शिंदे, वंदना बंदावणे, अंतून घोडके, प्रकाश पारखे, केशव वर्पे, शिवशंकर भारती, राजन झांबरे, राजू कोदे, संगीता परदेशी, भाऊसाहेब नरवडे, सुनील कवडे, तुषार गायकवाड, जाकीर खान, चौधरी सर, डॉ .दिनेश वाघोलीकर, सदाशिव थोरात, उद्योगपती डॉ .संजय मालपाणी, गुणवंत साळवे, शोभा साळवे, व इतर अनेक कलावंतांना संधी मिळाली. चित्रीकरण स्थळासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सहकार्य केले होते.
ओळ ९३:
संगमनेरातील व्यापारी तरुण अमित कटारिया व राजेश पारख यांनी ‘ तात्या विंचू लागे राहो ‘ हा चित्रपट निर्माण केला होता. त्याला तालुक्यातील दोलासाने येथील अमोल मुके यांनी दिग्दर्शन केले होते. मुके आता मुंबईत सिनेमा क्षेत्रात संघर्ष करताहेत. जोशी स्वीटहोमचे मालक राजेश जोशी यांनी संपूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट ‘फुल टू धमाल’ संगमनेरात २०१६ साली तयार केला. या शिवाय संगमनेरातील अनेक तरुण या क्षेत्रात धडपड करताहेत. राजू कोदे व वसंत बंदावणे यांनी व्हिक्टोरिया क्रॉस मिळवलेल्या व मुळचे संगमनेर तालुक्यातले असलेले नामदेवराव जाधव यांच्या जीवनावर आधारित ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ नावाची एक फिल्म तयार केली. डॉ. एजाज शेख यांनी २००७ साली ‘कहा है मुस्कान?’ नावाची हिंदी फिल्म तयार केली होती. अनेक शोर्ट फिल्म्स केल्यानंतर आज २०१७ साली ते ‘संगमनेरी घोडा’ नावाची फिल्म बनवताहेत. तिचे दिग्दर्शन संदीप कोकणे नावाचा तरुण दिग्दर्शक करतो आहे.
 
कोकणे यांनी काही दिवस मुंबईत संघर्ष केल्यानंतर ते संगमनेरातल्या सांस्कृतिक क्षेत्रात परतले आहेत.आल्या आल्या त्यांनी “ बासरी “ नावाची शोर्टशॉर्ट फिल्म तयार केली. तुषार गायकवाड याला संधी मिळताच तो हीतोही दिग्दर्शन क्षेत्रात उतरलाय उतरला..त्याने नुकतीच उसतोडऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भावविश्वावर “फिस्ट “ नावाची अतिशय सुंदर फिल्म केली आहे. रत्नाकर सातपुते यांनी फिल्म निर्मितीचे रीतसर प्रशिक्षण घेवून “ मेनोपोज “ हा लघु चित्रपट निर्मिला आहे. दिगंबर सातपुतेही फिल्म निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी “ होलम राजा “ नावाच्या फिल्मचे चित्रीकरण नुकतेच संपवलेयसंपवले आहे. एडॲड. भाऊसाहेब गांडोळे यांनी “ डाव का मोडला ? “ या चित्रपटाची घोषणा केली आहे. केशव वर्पे यांनी “ खोपट “ नावाचा चित्रपट निर्मितीला घेतला आहे. लिनियर फिल्म्स च्या “ बळीराणी “ या लघुपटात वंदना बंदावणे, अंतून घोडके, भाऊसाहेब नरवडे, अक्षय बुऱ्हाडे, युववार्ताचे संपादक किसनराव हासे, प्रशांत त्रिभुवन, तुषार गायकवाड, या कलावंतांनी भूमिका केल्या आहेत. सांप्रतसांप्रतच्या काळात हे प्रकल्प संगमनेरात सुरुसुरू आहेत. ते पूर्ण झाल्यावरच त्याचे यशापयश ठरेल.
 
ई.टी.व्ही. मराठी वाहिनीवरील “ क्राईम डायरी “ या मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण २०११ साली संगमनेरात झाले. त्यात राजू कोदे, अंतून घोडके, वसंत बंदावणे, वंदना बंदावणे, संगीता परदेशी,राजन झांबरे,जाकीर खान,शिवशंकर भारती, प्रदीप तापडिया यांनी काम केले होते.राजू कोदे यांनी क्राईम डायरीच्या अनेक भागात भूमिका केली आहे.
 
बंदिशाळा या मालिकेतून कलाकार म्हणून काम सुरुसुरू केलेले अंतून घोडके यांनी पुढे थँक्यू विठ्ठला, गणवेश या सिनेमांत काम केले. जाकीर खान या कलावंताने रायरंद (?) व इतर काही सिनेमांतून काम केले आहे. राजन झांबरे यांचा मुलगा अभिनय झांबरे याने ‘संगमनेरी घोडा’ या फिल्ममध्ये प्रमुख भूमिका केली आहे.
 
वसंत बंदावणे यांनी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अनेक कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांत संगमनेरच्या संस्कृतीवर आधारित ‘इथं नांदते एकात्मता’ हा विशेष कार्यक्रम होता. याशिवाय संगमनेरातील भाऊसाहेब थोरात, [[बाळासाहेब थोरात]], डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे यांचेसह अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी टी.व्ही.वर घेतल्या आहेत. बंदावणे यांनी संगमनेरचे सर्वाधिक कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर सदर केले आहेत. गाजलेल्या ‘शक्तिमान’ या मालिकेतील कलावंत [[मुकेश खन्ना]] यांना २००० साली संगमनेरात आणून बंदावणे यांनी गर्दीचा उच्चांक मोडला होता. पंडित नेहरू जयंती शताब्दी निमित्त बालनाट्य महोत्सव घेऊन त्याच्या उद्घाटनाला महाभारत या मालिकेतील बाळकृष्णाची भूमिका करणारा केवल शहा याला आणले होते. भाऊसाहेब थोरात या महोत्सवाचे उद्घाटक होते. शालेय अभ्यासक्रमावर मनोरंजक फिल्म तयार करून ती सर्व शाळांमध्ये मुलांना दाखवण्यात आली होती. तिचे प्रकाशन १९८८ साली [[नानासाहेब गोरे]] यांनी केले होते.
 
वसंत बंदावणे यांनी आपल्या लिनियर फिल्म या संस्थेच्या वतीने किशोरवयीन मुलांसाठी अभिनय वर्गाचे सातत्याने आयोजन केले आहे. यातील बऱ्याच बालकलाकारांना मालिका व लघु चित्रपटातून संधी दिली आहे.
 
काही वर्षांपूर्वी मालपाणी उद्योग समूह व माहेश्वरी मंडळाने सुरुसुरू केलेल्या ‘संगमनेर फेस्टिव्हल’ने संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासात भर घातली आहे. गणेशोत्सव काळातला हा फेस्टिव्हल म्हणजे संगमनेरकरांसाठी मनोरंजनाची मेजवानीच असते. त्यात दर्जेदार नाटके, नृत्ये, धार्मिक कार्यक्रम यांचा मनोहारी संगमच असतो. डॉ. संजय मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीष मालपाणी, सचिन पलोड, व संगमानेरातील सर्व गणेश मंडळांचा सहभाग यात असतो.
 
नृत्य क्षेत्रात कुलदीप व विनोद कागडे बंधू चांगली कामगिरी करीत आहेत. नृत्य प्रशिक्षण वर्ग चालवून ते संगमनेरच्या कलाकारांना टी.व्ही. वर संधी उपलब्ध करून देत आहेत.
 
संगमनेरचा सांस्कृतिक इतिहास कांताबाई सातारकर सह रघुवीर खेडकर या तमाशा मंडळाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. या तमाशा मंडळाने संगमनेरचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वदूर नेले आहे. कांताबाई सातारकर या हाडाच्या कलावंत आहेत तर चिरंजीव रघुवीर उत्तम विनोदी अभिनेता आहे. दोघांनीही कलेसाठी आपले आयुष्य वेचले आहे. मंदाराणी, अलका या नृत्य निपुण कलावंत आहेत. चित्रपटात अनेक संधी चालून आल्या असतानाही त्यांनी रंगमंचाची सेवा सोडली नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पारं्परिकपारंपरिक तमाशाची कला टिकवून ठेवली आहे.
 
संगीत, चित्रकला, शिल्प या कलांतही संगमनेरचे कलावंत अग्रेसर होते. अनेक नामवंत कलाकारांनी महाराष्ट्रभर काम करून आपला ठसा उमटवला आहे. त्या काळात उमाजी पेंटर यांनी प्रभातच्या गोकुळचा चोर या सिनेमासाठी सेटचे काम केल्याचा उल्लेख सापडतो. या परंपरेचा आजचा दुवा म्हणजे कांचनकुमार बंदावणे व रुपालीरूपाली बंदावणे. हे दोघेही संगमनेरचे कलावंत आजमितीला हिंदी चित्रपट सृष्टीत कलादिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. अनेक नावाजलेले सिनेमा व लाईव्ह शो त्यांच्या नावावर जमा आहेत. प्रसिद्ध अभिनेते, कवी किशोर कदम (सौमित्र) हे संगमनेर तालुक्यातील तळेगावचे. तर जवळेकडलगचा नृत्यकार संतोष कडलग हा झी मराठीच्या ‘एकापेक्षा एक’ या नृत्य स्पर्धेत सेकंड विनर होता. ई टी.व्ही.च्या ‘हल्ला बोल’मधेही तो सहभागी होता. गौरव गुंजाळ या कलावंतानेही ई.टी. व्ही.च्या डब्बा गोल, व झी टोकीजच्या कॉमेडी ॲवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती. आजही २०१७ साली संगमनेरचे अनेक कलावंत दृशव्य माध्यमाच्या मायावी दुनियेत जाण्यासाठी धडपड करीत आहेत.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले