"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ७७:
संगमनेर शहराचा नाट्य इतिहास
 
{{विस्तार}} महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या नाट्य स्पर्धा होत असत. किंवा ते कामगार कल्याण मंडळाच्या व राज्य नाट्य स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवत असत.मंडळाच्या नाटकांना प्रा. जगदीश पिंगळे सर , डॉ.सोमनाथ मुटकुळे व नासिकाचे प्रकाश धात्रक दिग्दर्शन करीत. पिंगळे सरांची दिग्दर्शन करण्याची एक खास स्टाईल होती. त्यांनी सासरेबुवा जरा जपून, नरपशू,थेंब थेंब आभाळ,संध्या छाया,अशी पाखरे येती इ. नाटके केली. अत्यंत शिस्तप्रिय असा हा दिग्दर्शक. या स्पर्धेत बक्षिसे मिळवण्याची परंपरा मंडळाने कायम राखली होती.
{{विस्तार}}
या संघात मंडळाचेच कर्मचारी अभिनेते असत. पण महिला कलावंत मात्र बाहेरच्या असत. म्हणून वंदना जोशी, संगीता परदेशी व सौ. संध्या भाटे ताई, कु.आश्लेषा गोडबोले,सौ. माधुरी जाधव या नाटकांत कामे करीत. विठ्ठल पायमोडे, प्रकाश भाटे, प्रकाश शिंदे, दिवाणजी पवार, नारायण वळसे, प्रकाश घोंगडे, शशिकांत मुळे, सौ.उगले, दिनकर माघाडे,नंदकुमार बर्डे,विजय उमप, इ. कलावंतांच्या यात प्रमुख भूमिका असत.” थेंब थेंब आभाळ “ या नाटकाला राज्यस्तरीय प्रथम बक्षीस मिळाले होते तर वंदना जोशी हिला अभिनयाचे रौप्य पदक मिळाले होते. “ अशी पाखरे येती “ नाटकाला राज्य द्वितीय पारितोषिक मिळाले होते.
या शिवाय मारवाडी समाजाच्या तरुणांचा “ युवा महेश ” नावाचा नाट्य ग्रुप आहे. तेही विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत असत.
संगमनेरकरांना दर्जेदार नाटके दाखवण्याचे व त्यांची रसिकता टिकवून ठेवण्याचे काम बोऱ्हाडे बंधूंनी केले. सुधाकर बोऱ्हाडे व केशवराव बोऱ्हाडे अशी त्यांची नावे. दोघेही हयात नाहीत.पुढे ही परंपरा त्यांचा चिरंजीव चंद्रकांत बोऱ्हाडे याने काही काळ चालवली. त्याचेही निधन झाले. कै.मोहन जोशी हे ही दर्जेदार नाटके संगमनेरला आणत असत. पण कवी अनंत फंदी रंगमंचाची दुर्दशा झाल्याने नाटके आणणे बंद झाले. दूरदर्शनचा या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. स्थानिक कलावंतांनाही रंगमंच उपलब्ध नसल्याने नाटकांविषयी त्यांची ओढ कमी झाली. नूतनीकरणाच्या नावाखाली अनेक वर्ष नाट्यगृह बंद राहिल्याने आलेली मरगळ अजूनही गेलेली नाही.हे संगमनेरच्या नाट्य चळवळीचे वास्तव आहे. आज नाट्यगृह पूर्ण होवूनही त्यात अनेक उणीवा असल्याने रंगकर्मी ते वापरायला अनुत्सुक आहेत. त्यात योग्य ते बदल झाल्यास नाट्य चळवळीला पुन्हा जोर येईल.
आज चित्रपट, मालिका हे नाट्य क्षेत्राकडे कल कमी होण्याचे प्रमुख कारण असल्याचे आपण म्हणतो. पण या क्षेत्रातही संगमनेरच्या कलावंतांनी भरीव कामगिरी केली आहे. कधीकाळी संगमनेर जवळच्या निम्बाळे येथे वास्तव्य असलेल्या जॉनी वॉकर या विनोदी अभिनेत्याने सिनेसृष्टी गाजवली होती. १९७६ ला संगमनेरच्या युसुफ खान या कलावंताने कुठल्याशा सिनेमात छोटे काम केले होते.पुढे त्यांनी संगमनेरला फोटो स्टुडीओ टाकला होता. संग्रामाचा कलावंत राजन झांबरे याने माहेरची साडी, गौराचा नवरा या सिनेमात छोट्या भूमिका केल्या आहेत. पुढे मुंबईला सिनेमात जायचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले तरी वेगवेगळ्या मालिका ,सिनेमात ते आजही काम करीत आहेत.
संग्रामाची नाट्य चळवळ जोरात चालू असतांनाच संस्थेचे सचिव व कलावंत वसंत बंदावणे यांनी १९८४ साली सिनेमा काढण्याची तयारी सुरु केली. हा एक धाडसी प्रयोग होता. डॉ.सोमनाथ मुटकुळे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. डॉ.मुटकुळे यांचे दिग्दर्शन असलेल्या “ प्रायचीत्त “ या सिनेमाचे चित्रीकरण सुरु झाले. संभाजीराजे थोरात यांच्या बंगल्यात प्रसिद्ध छायाचित्रकार कै.सुनील बूब चित्रीकरण करीत होते. रात्रंदिवस काम चाले. व्यवसायामुळे त्यांना ते जमेना. मग स्वत:चा कॅमेरा घ्यायचा ठरले. त्यासाठी डॉ.सुधीर तांबे, कै.डॉ.देवेंद्र ओहारा, डॉ.जी.पी.शेख, डॉ.श्रीकांत देशमुख,कांताबाई सातारकर यांनी पैसे दिले व नवा कॅमेरा आणला.पुढे हा सिनेमा पूर्ण झाला पण मार्केटिंग माहित नसल्याने प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. हा संगमनेरातील चित्रपट निर्मितीचा पहिला प्रयत्न असावा.तसेच पहिली मालिका निर्मितीही त्यांच्याच नावावर जमा आहे. बंदावणे यांनी २०१२ साली लिनियर फिल्म्स ही निर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत संपूर्ण संगमनेरची, स्वत: लिहिलेली व निर्मिती असलेली “बंदिशाळा “ही मालिका निर्माण केली. ती सह्याद्री वाहिनीवरून ५२ भागात प्रसारित झाली. तिला कला संस्कृती दर्पणची तीन नामांकानेही मिळाली होती. या मालिकेत संगमनेरच्या सुर्यकांत शिंदे,वंदना बंदावणे, अंतून घोडके, प्रकाश पारखे, केशव वर्पे,शिवशंकर भारती,राजन झांबरे,राजू कोदे,संगीता परदेशी, भाऊसाहेब नरवडे,सुनील कवडे, तुषार गायकवाड, जाकीर खान,चौधरी सर,डॉ.दिनेश वाघोलीकर,सदाशिव थोरात, उद्योगपती डॉ.संजय मालपाणी, गुणवंत साळवे,शोभा साळवे, व इतर अनेक कलावंतांना संधी दिली.चित्रीकरण स्थळासाठी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी सहकार्य केले होते.
संगमानेरातील व्यापारी तरुण अमित कटारिया व राजेश पारख यांनी ‘ तात्या विंचू लागे राहो ‘ हा चित्रपट निर्माण केला होता.त्याला तालुक्यातील दोलासाने येथील अमोल मुके यांनी दिग्दर्शन केले होते.मुके आता मुंबईत सिनेमा क्षेत्रात संघर्ष करताहेत. जोशी स्वीटहोमचे मालक राजेश जोशी यांनी संपूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट “फुल टू धमाल “ संगमनेरात २०१६ साली तयार केला. या शिवाय संगमनेरातील अनेक तरुण या क्षेत्रात धडपड करताहेत. राजू कोदे व वसंत बंदावणे यांनी व्हिक्टोरिया क्रॉस मिळवलेल्या व मुळचे संगमनेर तालुक्यातले असलेले नामदेवराव जाधव यांच्या जीवनावर आधारित “ व्हिक्टोरिया क्रॉस “ नावाची एक फिल्म तयार केली. डॉ.एजाज शेख यांनी २००७ साली “ कहा है मुस्कान ? “ नावाची हिंदी फिल्म तयार केली होती.अनेक शोर्ट फिल्म केल्यानंतर आज ते “ संगमनेरी घोडा “ नावाची फिल्म बनवताहेत. तिचे दिग्दर्शन संदीप कोकणे नावाचा तरुण दिग्दर्शक करतोय.कोकणे यांनी काही दिवस मुंबईत संघर्ष केल्यानंतर ते संगमनेरातल्या सांस्कृतिक क्षेत्रात परतले आहेत.आल्या आल्या त्यांनी “ बासरी “ नावाची शोर्ट फिल्म तयार केली. तुषार गायकवाड याला संधी मिळताच तो ही दिग्दर्शन क्षेत्रात उतरलाय .त्याने नुकतीच उसतोड कामगारांच्या मुलांच्या भावविश्वावर “फिस्ट “ नावाची अतिशय सुंदर फिल्म केली आहे. रत्नाकर सातपुते यांनी फिल्म निर्मितीचे रीतसर प्रशिक्षण घेवून “ मेनोपोज “ हा लघु चित्रपट निर्मिला आहे. दिगंबर सातपुतेही फिल्म निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी “ होलम राजा “ नावाच्या फिल्मचे चित्रीकरण नुकतेच संपवलेय. एड. भाऊसाहेब गांडोळे यांनी “ डाव का मोडला ? “ या चित्रपटाची घोषणा केली आहे.केशव वर्पे यांनी “ खोपट “ नावाचा चित्रपट निर्मितीला घेतला आहे. लिनियर फिल्म्स च्या “ बळीराणी “ या लघुपटात वंदना बंदावणे,अंतून घोडके, भाऊसाहेब नरवडे,अक्षय बुऱ्हाडे, युववार्ताचे संपादक किसनराव हासे, प्रशांत त्रिभुवन, तुषार गायकवाड, या कलावंतांनी भूमिका केल्या आहेत. सांप्रत काळात हे प्रकल्प संगमनेरात सुरु आहेत.ते पूर्ण झाल्यावरच त्याचे यशापयश ठरेल.
ई.टी.व्ही. मराठी वाहिनीवरील “ क्राईम डायरी “ या मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण २०११ साली संगमनेरात झाले. त्यात राजू कोदे, अंतून घोडके, वसंत बंदावणे, वंदना बंदावणे, संगीता परदेशी,राजन झांबरे,जाकीर खान,शिवशंकर भारती, प्रदीप तापडिया यांनी काम केले होते.राजू कोदे यांनी क्राईम डायरीच्या अनेक भागात भूमिका केली आहे.
बंदिशाळा या मालिकेतून कलाकार म्हणून काम सुरु केलेले अंतून घोडके यांनी पुढे थन्क्यू विठ्ठला, गणवेश या सिनेमात काम केले आहे. जाकीर खान या कलावंताने रायरंद व अनेक सिनेमातून काम केले आहे. राजन झांबरे यांचा मुलगा अभिनय झांबरे याने संगमनेरी घोडा या फिल्म मध्ये प्रमुख भूमिका केली आहे.
वसंत बंदावणे यांनी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अनेक कार्यक्रम सदर केले आहेत.त्यात संगमनेरच्या संस्कृतीवर आधारित “ इथं नांदते एकात्मता “ हा विशेष कार्यक्रम होता.याशिवाय संगमनेरातील स्व. भाऊसाहेब थोरात, मा. बाळासाहेब थोरात, मा. डॉ.सुधीर तांबे, मा. दुर्गाताई तांबे यांचेसह अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी टी.व्ही.वर घेतल्या आहेत. बंदावणे यांनी संगमनेरचे सर्वाधिक कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर सदर केले आहेत. गाजलेल्या “ शक्तिमान “ या मालिकेतील कलावंत मुकेश खन्ना यांना २००० साली संगमनेरात आणून बंदावणे यांनी गर्दीचा उच्चांक मोडला होता. पंडित नेहरू जयंतीशताब्दी निमित्त बालनाट्य महोत्सव घेवून त्याच्या उद्घाटनाला महाभारत या मालिकेतील बाळकृष्णाची भूमिका करणारा केवल शहा याला आणले होते. स्व. भाऊसाहेब थोरात या महोत्सवाचे उद्घाटक होते.शालेय अभ्यासक्रमावर मनोरंजक फिल्म तयार करून ती सर्व शाळांमध्ये मुलांना दाखवण्यात आली होती. तिचे प्रकाशन १९८८ साली मा.नानासाहेब गोरे यांनी केले होते.
काही वर्षांपूर्वी मालपाणी उद्योग समूह व माहेश्वरी मंडळाने सुरु केलेल्या “ संगमनेर फेस्टिवल “ ने संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासात भर घातली आहे. गणेशोत्सव काळातला हा फेस्टिवल म्हणजे संगमनेरकरांसाठी मनोरंजनाची मेजवानीच असते. दर्जेदार नाटके,नृत्य,धार्मिक कार्यक्रम यांचा मनोहारी संगमच असतो.डॉ.संजय मालपाणी,मनीष मालपाणी, गिरीष मालपाणी,सचिन पलोड, व संगमानेरातील सर्व गणेश मंडळांचा सहभाग यात असतो.
नृत्य क्षेत्रात कुलदीप व विनोद कागडे बंधू चांगली कामगिरी करीत आहेत. नृत्य प्रशिक्षण वर्ग चालवून ते संगमनेरच्या कलाकारांना टी.व्ही. वर संधी उपलब्ध करून देत आहेत.
वसंत बंदावणे यांनी आपल्या लिनियर फिल्म या संस्थेच्या वतीने किशोरवयीन मुलांसाठी अभिनय वर्गाचे सातत्याने आयोजन केले आहे.यातील बऱ्याच बालकलाकारांना मालिका व लघु चित्रपटातून संधी दिली आहे.
संगमनेरचा सांस्कृतिक इतिहास “ कांताबाई सातारकर सह रघुवीर खेडकर ” तमाशा मंडळाशिवाय पूर्णच होवू शकत नाही.या तमाशा मंडळाने संगमनेरचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वदूर नेले आहे. कांताबाई सातारकर या हाडाच्या कलावंत आहेत तर चिरंजीव रघुवीर उत्तम विनोदी अभिनेता आहे. दोघांनीही कलेसाठी आपले आयुष्य वेचले आहे. मंदाराणी,अलका या नृत्य निपुण कलावंत आहे. चित्रपटात अनेक संधी चालून आल्या असतानाही त्यांनी रंगमंचाची सेवा सोडली नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पारंपारिक तमाशा कला टिकवून ठेवली आहे.
संगीत, चित्रकला, शिल्प या कलांतही संगमनेरचे कलावंत अग्रेसर होते. अनेक नामवंत कलाकारांनी महाराष्ट्रभर काम करून आपला ठसा उमटवला आहे. त्या काळात उमाजी पेंटर यांनी प्रभातच्या गोकुळचा चोर या सिनेमासाठी सेटचे काम केल्याचा उल्लेख सापडतो. या परंपरेचा आजचा दुआ म्हणजे कांचनकुमार बंदावणे व रुपाली बंदावणे. हे दोघेही संगमनेरचे कलावंत आजमितीला हिंदी चित्रपट सृष्टीत कलादिग्दर्शक म्हणून काम करताहेत. अनेक नावाजलेले सिनेमा व लाईव्ह शो त्यांच्या नावावर जमा आहेत. प्रसिद्ध अभिनेते, कवी किशोर कदम ( सौमित्र ) हे संगमनेर तालुक्यातील तळेगावचे. तर जवळेकडलगचा नृत्यकार संतोष कडलग हा झी मराठीच्या “ एकापेक्षा एक “ या नृत्य स्पर्धेत सेकंड विनर होता. इ टी.व्ही.च्या हल्ला बोल मधेही तो सहभागी होता. गौरव गुंजाळ या कलावंतानेही ई.टी. व्ही. च्या डब्बा गोल, व झी टोकीजच्या कॉमेडी अवार्ड शो मध्ये हजेरी लावली आहे. अनेक कलावंत या मायावी दुनियेत जाण्यासाठी धडपड करीत आहेत.
असा हा नाट्य,मालिका,चित्रपटकलेचा धावता आढावा आपण या लेखात घेतला आहे. इतिहास ही अशी गोष्ट आहे की,त्याचे जितके उत्खनन करू, जितका शोध घेवू तितके हरवलेले सापडत जाते. म्हणून हा आढावा परिपूर्ण आहे असा माझा दावा नाही. लेख वाचून आपणाला काही त्रुटी आढळल्यास कळवू शकता. योग्य पुरावे असल्यास त्याचा समावेश नक्की केला जाईल. या प्रवाहात सातत्याने भर पडत आहे. काळाच्या ओघात तो अधिक प्रवाही होईल, यात शंका नाही....
लेख – वसंत बंदावणे
लेखक,निर्माता
लिनियर फिल्म्स, संगमनेर
 
== संदर्भ ==
* [[http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Ahmadnagar/places_s.html#1 महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले